Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा;विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड : महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करताना बीड जिल्ह्याला विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यम

बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी : मुख्यमंत्री फडणवीसविरोधकांनी मन मोठं करण्याचा सल्ला; काँगे्रस उमेदवार देण्यावर ठाम
‘मिसिंग लिंक’ 1 मेपासून होणार सुरू
सम्राट चौधरी बनले बिहारचे 24 वे मुख्यमंत्रीविजय चौधरी व विजेंद्र यादव उपमुख्यमंत्री

बीड : महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करताना बीड जिल्ह्याला विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान आणि पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाल्या की, मराठवाडा ही संत, शूरवीर आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची भूमी असून या भूमीचा समृद्ध वारसा आपल्याला प्रेरणा देणारा आहे. संत गोरोबाकाकांच्या तेर नगरीशी असलेले आपले नाते अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्याच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात आली असून बीड विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. युवकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळावे यासाठी ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या सहकार्याने एमआयडीसीमध्ये सुमारे 197 कोटी रुपयांचा ‘सी-ट्रिपल आयटी’ प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचा लाभ सुमारे 7 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा संकुलात 25 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून जुलै 2026 मध्ये ‘स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच बीड-अहिल्यानगर-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामांसाठी निधी मंजूर झाला असून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा संकल्प आहे. आरोग्य क्षेत्रात एमआरआय सुविधा, माता-बाल संगोपन सेवा आदी आधुनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. ‘प्रधानमंत्री आवास योजना’ अंतर्गत घरकुले पूर्ण करण्यात बीड जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सन 2026-27 साठी 623 कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक योजना आराखडा मंजूर झाला असून आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान ‘स्व-गणना’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर राज्य सरकार कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘महाराष्ट्र राज्य सेवा हक्क’ अधिनियमाच्या अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने 90.13 टक्के सेवा वेळेत देत उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा मुंबईत सन्मान झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर पोलीस दलाचे संचलन पार पडले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्ञानोबा मुंडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पोलिस पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध विभागांच्या पथकांनी मानवंदना दिली तसेच पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. शेवटी उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS