Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

गेवराई : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्ती येथे आदर्श समाज सुधारक ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व

बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन
साई मंदिराच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रम : चायल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मानवंदना
The consecration ceremony of the idol of Saint Bhagwan Baba at Kavadgaon is  celebrated with enthusiasm.

गेवराई : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्ती येथे आदर्श समाज सुधारक ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी यांच्या शुभहस्ते व ब्रम्हवृदांच्या मंत्रघोषात उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होवून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.
दरम्यान यावेळी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत ह.भ.प.दत्ता महाराज गिरी यांची किर्तन सेवा झाली. यावेळी भाजपचे गेवराई तालुका समन्वयक श्रीकांत सानप, पत्रकार विनोद पौळ, ह.भ.प.तुकाराम महाराज गिरी, अंकुश खरात, संतोष थोरात, तुकाराम तळतकर, श्रीधर पौळ, विजय राठोड, दिलीप चौधरी, चंद्रकांत भोसले, महादेव बिचकुले, प्रकाश खरात, नारायण गोल्हार, सुधाकर सानप, एकनाथ मोंढे, डॉ.तांदळे, माऊली महाराज, लक्ष्मण समगे, पांडुरंग खेडकर सह महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  दरम्यान यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची गावातून संवाद्य टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी घराबाहेर सडा रांगोळी काढून या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत केले. या मिरवणुकीत बालगोपाळांसह वारकरी, टाळकरी, महिला, पुरुष मंडळींनी मोठ्या उत्साहाने सहभागी होवून जय हरी विठ्ठल व भगवानबाबांचा जयघोष केला.यामुळे परिसर दणाणून गेला होता. महंत दत्ता महाराज गिरी यांच्या शुभहस्ते व वेदमुर्ती अशोक देवा मुळे यांच्यासह ब्रम्हवृदांच्या मंत्रोच्चारामध्ये कवडगावसह खेडकर वस्ती येथील विवाहित जोडप्यांच्या उपस्थितीत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही आकर्षक मुर्ती नाशिक येथून आणलेली असून या मंदिरासाठी अंबादास खेडकर यांनी चार गुंठे जमीन दान दिली आहे. तर तीन दिवशीय कार्यक्रमात कुंडलिक घुगे, सर्जेराव सानप यांनी पहिल्या दिवशी अन्नदान केले, दुसर्‍या दिवशी रामदास माने, भारत माने ,महादेव ढाकणे सोमीनाथ ढाकणे , तर तिसर्‍या दिवशी छबुराव घुगे यांनी सकाळी तर माऊली सर्जेराव सांगळे, सोमनाथ सर्जेराव सांगळे यांच्या वतीने शेवटी कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेडकर वस्ती व कवडगाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

COMMENTS