Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन

बेलापूर : विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल (बेलापूर) च्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.  यानिमित्त डॉ.आंबेडकर या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले
डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मानवंदना


बेलापूर : विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल (बेलापूर) च्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.  यानिमित्त डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली; तसेच जनजाती सेवावस्तीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
बेलापूर येथील विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती सोहळा आझाद मैदान येथे पार पडला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर आझाद मैदान येथे किशोर निर्मळ(उत्तर अहिल्यानगर जिल्हा संघचालक), ऋषिकेश भागवत(प.महाराष्ट्र बजरंग दल गोरक्षा प्रमुख), सुरेश महाले (जिल्हामंञी,विश्व हिंदू परिषद), वसंतराव  कदम(जिल्हा संघटक समरसता गतविधी आर.एस.एस.उत्तर अहिल्यानगर जिल्हा), कुलदीप  ठाकुर(बजरंग दल जिल्हा संयोजक) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यानिमित्ताने मान्यवरांचे हस्ते जनजाती सेवावस्तीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी पतित पावन संघटनेचे जिल्हा संघटक सुनील मुथा,ऋषी भागवत,अभिषेक खंडागळे, सावकार अमोलिक, रमेश अमोलिक आदिंसह बेलापूर येथील विश्व हिंदू परिषाद तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एपीआय गणेश जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS