सत्तेच्या माजात हैवानपणा! मंत्र्यांच्या माजी ओएसडीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; चिमुकल्यालाही बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेच्या माजात हैवानपणा! मंत्र्यांच्या माजी ओएसडीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; चिमुकल्यालाही बेदम मारहाण

नांदेड : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली असून, समाजकल्याण विभागातील अधिकारी तथा राज्याचे ओबीसी मंत्री अतुल

पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक
कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
ओबीसी विकासासाठी शासनाचा ठोस रोडमॅप; नांदेडमध्ये कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात
The current image has no alternative text. The file name is: savi.jpg

नांदेड : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली असून, समाजकल्याण विभागातील अधिकारी तथा राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) विजय धुलचंद कारंडे यांच्याविरोधात पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्तेचा आणि पदाचा माज डोक्यात गेल्याने कौटुंबिक वाद थेट जीवघेण्या हिंसाचारापर्यंत पोहोचल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रशासन व सामाजिक क्षेत्रातून उमटत आहे.
30 एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्थानकाजवळील क्वीन्स गार्डन परिसरातील सरकारी निवासस्थानी ही घटना घडली. तक्रारीनुसार, विजय कारंडे मोबाईलवर चॅटिंग करत असताना त्यांच्या पत्नीने मोबाईलचा पासवर्ड विचारला. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पत्नीने संशय व्यक्त केल्याचा राग मनात धरून कारंडे यांनी संतापाचा ताबा गमावत पत्नीला शिवीगाळ केली आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर तिचा गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अमानुष प्रकारात सर्वाधिक अस्वस्थ करणारी बाब म्हणजे आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या चिमुकल्या मुलालाही आरोपीने निर्दयीपणे मारहाण केल्याचे समोर आले आहे. घरातील भीषण वातावरणातून जीव वाचवत पीडित महिलेने मुलासह थेट कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचारासंदर्भातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. विजय कारंडे हे मूळचे नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असून, प्रतिनियुक्तीवर मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओएसडी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणानंतर मंत्री कार्यालयाकडून कारंडे यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांच्या खासगी सचिवावर पत्नीच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा एका वरिष्ठ अधिकार्‍याचे नाव कौटुंबिक अत्याचारात समोर आल्याने प्रशासनातील सत्तेचा गैरवापर, नैतिक अधःपतन आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझे कुणी वाकडे करू शकत नाही, अशी दर्पोक्ती करणार्‍या अधिकार्‍याचा हा कथित माज आता कायद्याच्या कठघर्‍यात उभा ठाकला आहे.

COMMENTS