Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

कुंडलवाडी : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ओबीसी विकास, दुग्धविकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी 30 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याचा दौर

बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?
जे बोलतो ते करतो; आरोग्य व शिक्षणासाठी माझी बांधिलकी कायम-खा.डॉ. गोपछडे
भूमी अभिलेख कार्यालयावरून श्रेयाची लढाई; शांतपणे डाव साधला खा.चव्हाण यांनी

कुंडलवाडी : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ओबीसी विकास, दुग्धविकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी 30 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी कुंडलवाडी शहराच्या प्रतिनिधींनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत शहरातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत संबंधित कामांसाठी मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले. शहराच्या पायाभूत सुविधांसह रस्ते, पाणीपुरवठा आदी महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्षा  प्रेरणाताई  कोटलावार व गजानन  कोटलावार यांनी मंत्री अतुल सावे यांचा सत्कार करून कुंडलवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबी मांडल्या. बैठकीस खासदार डॉ. अजित गोपछडे तसेच जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांची उपस्थिती होती. कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.

COMMENTS