Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अटल ते सावरकर : नांदेडमध्ये स्मारक राजकारणाला वेग; वाजपेयींच्या महाराष्ट्रातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी खा. अशोकराव चव्हाण सक्रिय

नांदेड : नांदेड शहरात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी हालचाली वेगाने

अंदाज समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष? बिलोलीतील अधिकार्‍यांच्या निलंबनास विलंब; नांदेड दौर्‍याच्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह
खा.अशोक चव्हाण यांनी केली स्वगणना; नागरिकांना सहभागाचे आवाहन
पीरबु-हान नगर सबस्टेशनवरून श्रेयवाद तापला;उपकेंद्र मंजुरीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आमनेसामने; नागरिक मात्र अखंडित वीजपुरवठ्यच्या प्रतीक्षेत
Atal Bihari Vajpayee Statue Nanded: नांदेडमध्ये वाजपेयींचा पुतळा; अशोक  चव्हाणांचा मास्टरस्ट्रोक!

नांदेड : नांदेड शहरात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या असून भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी या विषयात थेट पुढाकार घेतला आहे. पुतळ्यासाठी प्रस्तावित जागेबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भाजपाच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या काळात पक्षाध्यक्ष म्हणून वाजपेयी यांनी नांदेडमध्ये सभा घेतली होती. मात्र त्या काळातील राजकीय परिस्थितीमुळे शहरातील प्रमुख मैदान उपलब्ध न झाल्याने सभा अन्यत्र आयोजित करावी लागली होती. काळ बदलला आणि आता त्याच नेत्याचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्धार भाजपकडून व्यक्त होत आहे. मनपा निवडणुकीदरम्यान भाजपाने जाहीर केलेल्या संकल्पनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, समाजसेवक-भारतरत्न नानाजी देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर मनपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत वाजपेयी यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर मनपा प्रशासनाने योग्य जागेच्या शोधाला सुरुवात केली. दक्षिण नांदेडमधील कौठा परिसरातील मामा चौकाजवळील सुमारे अर्धा एकर जागा पुतळ्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनीही या प्रक्रियेला दुजोरा दिला. दरम्यान, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात वाजपेयी यांच्या पुतळ्याची उभारणी पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर सावरकर आणि नानाजी देशमुख यांच्या स्मारकांसाठीही योग्य जागा निश्चित केली जाईल. वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्याने याच वर्षात पुतळ्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी खा.  चव्हाण प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यातील वैचारिक भिन्नता असूनही त्यांचे व्यक्तिगत संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण होते. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल वाजपेयी यांनी अनेकदा गौरवोद्गार काढले होते. दहा वर्षांपूर्वी शारदा भवन परिसरात शंकरराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. आता वाजपेयी यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नांदेडमध्ये आणखी एका राष्ट्रीय नेत्याच्या स्मृतीला आकार देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

COMMENTS