Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिरसाळ्यात महावितरणचा भोंगाळ कारभार! वसुली जोरात, लाईट कोमात; नागरिक आक्रमकदररोज 33 केव्हीचा बिघाड; हे गणित काय?वीज नसतानाही अव्वाच्या सव्वा बिल आणि वसुलीसाठी होणारा तगादा.विजेअभावी पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग दुकाने आणि इतर लघुउद्योग संकटात.वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम.

सिरसाळा : येथील महावितरण विभागाचा भोंगाळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन सक्त

विज्ञानामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर विजय मिळवता येतो-डॉ.सुधिर येवले
श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव -1978 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय गेट-टुगेदर उत्साहात
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु

सिरसाळा : येथील महावितरण विभागाचा भोंगाळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन सक्ती करत असताना, दुसरीकडे मात्र वीज पुरवठा पुरता ’कोमात’ गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरसाळा परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे 33 केव्ही लाईनचा. आश्चर्याची बाब म्हणजे, या लाईनमध्ये दररोज तांत्रिक बिघाड (ऋर्रीश्रीं) कसा होतो? हा नैसर्गिक बिघाड आहे की देखभाल-दुरुस्तीतील हलगर्जीपणा, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. दिवसातून दहा वेळा वीज जाणे आता शिरसाळावासीयांच्या अंगवळणी पडले आहे, पण यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.सिरसाळा येथील स्थानिक एम.एस.ई.बी. (चडएइ) सबस्टेशनची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या ठिकाणी नेमणूक असलेले कर्मचारी आणि अधिकारी नेमके करतात काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार तक्रार करूनही वरच्या लाईनचा बिघाड आहे असे ठराविक उत्तर देऊन ग्राहकांची बोळवण केली जाते. या सबस्टेशनचा कारभार पाहणारा खरोखर कोणी जबाबदार अधिकारी आहे की हे सबस्टेशन वार्‍यावर सोडले आहे, अशी संतप्त विचारणा ग्राहक करत आहेत. आता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन सिरसाळ्याचा वीज प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही नियमित वीज बिल भरतो, मग आम्हाला सुरळीत वीज का मिळत नाही? दररोज फॉल्ट होणे हे महावितरणचे अपयश आहे. जर लवकर सुधारणा झाली नाही, तर आम्ही सबस्टेशनवर धडक मोर्चा काढू.
– एक त्रस्त नागरिक, शिरसाळा

COMMENTS