Homeताज्या बातम्या

राजधानीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार; नीट घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच 'नीट' (NEET) मधील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर शनिवारी राजधानी

पोलिसांवरील दगडफेक भाजपच्या गुंडाकडूनअभिजीत दिपके यांचा गंभीर आरोप ; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्‍नचिन्ह
पुण्यात उद्या ‘कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलनकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी
आंदोलन की राजकीय महत्त्वाकांक्षा : एक कटाक्ष
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला  सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी, - Marathi News | Mumbai Tarun Bharat

नवी दिल्ली : देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ (NEET) मधील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर शनिवारी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन छेडले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत तब्बल पाच तास हे आंदोलन करण्यात आले. तसेच पुढील पाच दिवसांत राजीनामा न दिल्यास येत्या शनिवारी, १३ जून रोजी अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात हजारो विद्यार्थी, युवक तसेच काही पालक सहभागी झाले होते. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांची चौकशी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक माध्यमांवर सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या संघटनेचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले. अमेरिकेचा दौरा संपवून ते शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले आणि विमानतळावरून थेट आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांना संबोधित करताना परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर कठोर टीका केली आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध निर्णायक लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी केली. अनेक फलक आणि घोषणांमधून युवकांच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असून समाजातील मूलभूत प्रश्नांऐवजी इतर विषयांवर भर दिला जात आहे. रोजगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता हेच युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनादरम्यान एक व्यक्ती झुरळे नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी फवारणीची बाटली घेऊन आंदोलनस्थळी आली होती. काही आंदोलकांनी त्यास विरोध करत त्या व्यक्तीला तेथून दूर जाण्यास सांगितले. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले; मात्र परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. आंदोलनस्थळी दूरध्वनी आणि इंटरनेट सेवांमध्ये अडचणी येत असल्याची तक्रार काही सहभागींकडून करण्यात आली. तसेच अभिजीत दिपके यांच्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारने ठोस भूमिका घेण्याची मागणी सामाजिक माध्यमांवर या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून युवकांच्या प्रश्नांवर केंद्रित असलेल्या या मोहिमेची देशभरात चर्चा सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेला हा संघर्ष केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS