Homeताज्या बातम्याराजकारण

भाजपाचे राज्य… पण मनपात पुन्हा काँग्रेस स्टाईल कंत्राटदारी?जुन्याच कंत्राटदारांची ‘रि-एंट्री’; विकासकामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

कामे केली तसेच काही  कंत्राटकोणत्याही स्थानिक संस्थेमध्ये नव्या पक्षाची सत्ता आल्यानंतर ’नवा गडी नवा राज’ या म्हणीपमाणे सत्तेच्या सारीपाटावरील मह

कर्जाच्या दलदलीत अडकलेली नांदेड महापालिका; विकासाचे स्वप्न की आर्थिक दिवाळखोरीची चाहूल?
लोक अदालतीत महापालिकेची 1.46 कोटींची मालमत्ता कर वसुली
असर्जन नाका ते वाघाळा रस्ता ड्रेनेज खोदकामामुळे नादुरुस्त; नागरिकांचे हाल, तात्काळ दुरुस्तीची मागणी



कामे केली तसेच काही  कंत्राटकोणत्याही स्थानिक संस्थेमध्ये नव्या पक्षाची सत्ता आल्यानंतर ’नवा गडी नवा राज’ या म्हणीपमाणे सत्तेच्या सारीपाटावरील महत्त्वाचे घटक सुद्धा बदलणे आवश्यक असते. परंतु सत्ताकारणातील ’व्हिटामिन एम’चे महत्व वाढल्यामुळे कंत्राटदारी करणारी मंडळी नव्या सत्ता समीकरणांमध्ये सुद्धा आपले अबाधित वर्चस्व प्रस्थापित करतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या सत्ता समीकरणाकडे पहावे लागेल. महापालिकेवर प्रशासकराज असताना अनेक कंत्राटदारांनी अर्धवट कामे केली तसेच काही कंत्राटदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे केली. आता हीच मंडळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असणार्‍या महापालिकेमध्ये आर्थिक वाटाघाटी करून नव्याने काही मोठी कंत्राटे मिळविण्याच्या तयारी असल्याचे समजते.
नांदेड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असतानाही, काँग्रेसच्या काळात महापालिकेत मालामाल झालेली कंत्राटदार लॉबी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा शहरात रंगू लागली आहे. काही प्रभावशाली पदाधिकार्‍यांच्या आशीर्वादाने जुन्याच कंत्राटदारांना नव्या कामांची दारे उघडली जात असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. मागील काळात अर्धवट कामे, निकृष्ट दर्जा आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे चर्चेत राहिलेल्या काही कंत्राटदारांना पुन्हा अनुकूल वातावरण तयार करून देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे काहींना एकापेक्षा अधिक कामे मिळावीत यासाठी ऑफ-द-रेकॉर्ड हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन सत्तेमुळे मनपामध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि जबाबदारी येईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र भाजपाचा झेंडा हातात घेऊन काँग्रेसकालीन कार्यपद्धतीच पुढे सुरू असल्याची भावना आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. कामांची कागदपत्रे व्यवस्थित दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात ‘सेटिंग संस्कृती’ पुन्हा डोके वर काढत असल्याचा आरोप होत आहे. विकासकामांच्या नावाखाली पुन्हा एकदा आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याची कुजबुज मनपा वर्तुळात सुरू आहे.
बदलाची अपेक्षा… पण पद्धत तीच!
भाजपाच्या सत्तेनंतर मनपात प्रशासनिक शिस्त आणि दर्जेदार विकासकामे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता जुन्याच कंत्राटदारांच्या पुनरागमनामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

COMMENTS