Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रमिक नगर सातपूर येथे श्री. संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुरान कथेची सांगता

नाशिक - श्री.संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त व श्री.विठ्ठल रुक्मिणी,संत सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त श्रमिक नग

युद्धाचे धार्मिक संदर्भ
शिर्डी शहराचे रूपडे बदलणार
राज्यात आजपासून पाच दिवस मुसळधार पावसाचे

नाशिक – श्री.संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त व श्री.विठ्ठल रुक्मिणी,संत सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त श्रमिक नगर येथील माळी कॉलनी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. गेल्या ३४ वर्षापासून श्री. संत सावता माळी मित्र मंडळ यांच्यावतीने हृदयश्रीमंत संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करत आहे. यानिमित्ताने याही वर्षी महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांचे किर्तन सोहळे संपन्न झाले.

यामध्ये दि. १३ जुलै रोजी ह.भ. प.सुनीताताई कातोरे संगमनेर,

दि.१४ जुलै रोजी कीर्तनरत्न ह.भ.प. विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, 

दि.१५ जुलै रोजी विनोदाचार्य कीर्तनकार ह.भ.प शिवा महाराज बावस्कर बुलढाणा,

 दि.१६ जुलै रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी ह भ प सोपान महाराज सानप शास्त्री हिंगोलीकर यांचे कीर्तन झाले,तसेच सायंकाळी महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार ह .भ .प.समाधान महाराज भोजेकर जळगाव यांचे कीर्तन झाले, दि.१७ जुलै रोजी ह.भ.प गोपाळ महाराज, दि.१८ जुलै रोजी कीर्तनरत्न ह.भ.प. भागवताचार्य वासुदेव महाराज सोनवणे रावळगावकर,

दि.१९ जुलै रोजी राष्ट्रीय धर्माचार्य,महाराष्ट्र भूषण,समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन झाले या कीर्तन सोहळ्यास सातपूर सह परिसरातील बहुसंख्य माता भगिनी व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते, दि.२० जुलै रोजी आवाजाचे जादूगर व आई माझी मायेचा सागर फेम ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणाकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या सर्व किर्तन सोहळा साठी परिसरातील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला.  तसेच दिनांक १३ जुलै ते १९ जुलै पर्यंत शिवमहापुराण व अधिक मास कथा कथाकार ह.भ.प श्री सोपान महाराज रावळगावकर यांच्या अमृतवाणीतून संपन्न झाली. या निमित्ताने परिसरातून  ग्रंथ दिंडी व भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती  परिसरातील भाविकभक्त मोठ्या संख्येने या भव्य मिरवणूकित सहभागी झाले होते. नवजीवन  रक्तपेढी तर्फे रक्तदानाचे आयोजन करण्यात आले यामध्ये मंदिर समितीच्या सदस्यांनी , कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केले जवळपास ८० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच श्रीराम नेत्रालय तर्फे भव्य असे मोफत नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये शेकडो नागरिकांनी मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला

सदर या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मा. सभापती तथा नगरसेवक श्री.सदाशिव दादा माळी,स्वराज्य पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख करण गायकर, श्री संत सावता माळी मित्र मंडळाचे व श्री विठ्ठल रुक्मिणी संत सावता महाराज मंदिराचे अध्यक्ष श्रीराम मंडळ( मंडलिक),सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर, मा.नगरसेविका इंदुमती सुदाम नागरे, मा.नगरसेविका हेमलता कांडेकर,शिवसेना सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविता करण गायकर, बाळा जारे यांनी केले होते.  या कार्यक्रम सोहळ्यासाठी परिसरातील अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे बहुमोल असे सहकार्य लाभले मध्ये *विशेष अतिथी म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप सर* स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,विजय वाहुळे,नवनाथ शिंदे, किरण डोखे,मनोरमाताई पाटील, गिरीश आहेर,इंद्रभान सांगळे,नवनाथ वैराळ,सुरेश जाधव,तोलाजी शिंदे, पुंडलीक बोडके,महेश हिरे,विष्णुपंत घुगे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती.

या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत सावता माळी मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ माळी,सचिव राजेश महाजन,खजिनदार दिलीप महाले, ज्ञानेश्वर थोरात ,दीपक चव्हाण, बाळासाहेब गीते, गोविंद माळी, गुलाब माळी,प्रकाश महाजन, पोपटराव जेजूरकर,सावता सैंदाणे,सुपडू जाधव,रवी महाजन,ज्ञानेश्वर महाजन शशिकांत सोनवणे,दयाराम माळी,निवृत्ती बोरसे,गोरख सोनवणे,महेश माळी,गोरख मंडळ, विनोद महाजन,गोपाळ थोरात,ज्ञानेश्वर बोरसे,कुंदन माळी,गणेश बोरसे, भूषण महाले,विकास महाजन, दीपक महाजन,दीपक गांगुर्डे,भारत जाधव,बन्सीलाल बाविस्कर,हिम्मत माळी यांसह अनेक मंदिर समिती सदस्य व भाविकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS