Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा

https://www.youtube.com/watch?v=_PdKUl2rI2s कामगारांच्या हक्कासाठी आता भारतीय मजदूर संघ आक्रमक झाला आहे! प्रलंबित मागण्या आणि अन्यायाविरोधात आज

सातारच्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव
संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

कामगारांच्या हक्कासाठी आता भारतीय मजदूर संघ आक्रमक झाला आहे! प्रलंबित मागण्या आणि अन्यायाविरोधात आज कामगार आयुक्तालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. “कामगारांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा!” अशा घोषणांनी आयुक्तालय परिसर दणदणून गेला. किमान वेतन, कंत्राटी पद्धतीतील त्रुटी आणि सुरक्षा या प्रमुख मुद्द्यांवरून हा आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाला निवेदनं देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप मजदूर संघाने केला आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चाने प्रशासनाचे धाबे दणाणले असून, आता सरकार कामगारांच्या या आक्रोशाची दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS