Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हजारो ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी चलो शिक्षा की ओर या जनजागृती मोहिमेस सुरुवात

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील मौजे बोरफडी येथे बीड जिल्ह्यात एआयएम ट्रस्ट व ऊसतोड कामगार कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने  चलो शिक्षा की ओर  

AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल
जिल्हाधिकार्‍यांनी घेतली ऊसतोड कामागारांच्या समस्यांबाबत आढावा बैठक
ऊसतोड कामगारांची नोंदणी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण करण्याचे आवाहन

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील मौजे बोरफडी येथे बीड जिल्ह्यात एआयएम ट्रस्ट व ऊसतोड कामगार कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने  चलो शिक्षा की ओर  या हजारो ऊसतोड कामगारांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठीच्या मोहिमेची बीड तालुक्यातील मौजे बोरफडी या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावातून सुरवात करण्यात आली.
या मोहिमेच्या  उद्घाटनप्रसंगी   महाराष्ट्र लोकविकास मंचचे संस्थापक अध्यक्ष माननीय विश्वनाथ आण्णा तोडकर, बोरफडी चे सरपंच कैलास घुगे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग रवींद्र शिंदे, जिल्हा परिषद चे  शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप,उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच  बोरफडी चे सरपंच कैलास घुगे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी बोरफडी हायस्कुल बोरफडी चे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद गावातील महिला पुरुष नागरिक विद्यार्थी यांनी रली काढुन स्थलांतर थांबवण्यासाठी जनजागृती केली. प्रचंड उत्साहात महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांचे स्थलांतर थांबवण्यासाठी चे पहिले पाऊल उचलले आहे.आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मोहिम मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक गावात पोहोचणार आहे. हजारो विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजनेबद्दल माहिती गावागावात देण्यात येणार आहे.  शाहीर बंडू खराटे यांच्या शाहिरीने ऊसतोड कामगारांचे व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कैलास घुगे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय विश्वनाथ आण्णा तोडकर संस्थापक महाराष्ट्र लोकविकास मंच, प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र शिंदे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग बीड, श्रीकांत कुलकर्णी शिक्षणाधिकारी बीड, अनिरुद्ध सानप गटविकास अधिकारी प स बीड, भगवान सोनवणे उपशिक्षणाधिकारी, ऊसतोड कामगार कृती समितीचे निमंत्रक बाजीराव ढाकणे यांची उपस्थिती होती, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लालासाहेब पन्हाळे उपसरपंच, सुनील कुटे सामाजिक कार्यकर्ते, गोपीनाथ घुगे, गोरख घुगे, ग्रामपंचायत सदस्य ,दिनू कुटे पाटील , चिंतामण वाघमारे , कृष्णा कुटे ,सुमंत कुटे, अंकुश घुगे सर ,लालासाहेब घुगे , बप्पासाहेब घुगे, लिंबा जाधव ,रवी वाघमारे ,मोहन घुगे ,सुरेश घुगे ,तुळशीराम घुगे, कल्याण कुटे, घोडके सर मुख्याध्यापक बोरफडी हायस्कुल बोरफडी, सोनवणे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरफडी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि आशा स्वयंसेविका तसेच गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विश्वनाथ आण्णा तोडकर यांनी गावं बदलली पाहिजेत गाव बदलाचा अजेंडा गावकर्‍यांनी तयार केला पाहिजे व मुलांचे स्थलांतरित थांबवणे गरजेचे आहे परंतु पालकांचे स्थलांतर कायमस्वरूपी कसे थांबेल यासाठी उपाय योजना आखण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. रविंद्र शिंदे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत  भगवान बाबा निवासी वस्तीगृहाच्या बद्दल माहिती दिली व प्रत्येक ऊसतोड कामगारांनी नोंदणी करावी याबद्दल आग्रह व्यक्त केला तसेच बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी गाव विकासाच्या अनेक योजनेबद्दल समुदायाला माहिती दिली तसेच येत्या काळात मौजे बोरफडी येथे विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले. बोरफडी चे सरपंच कैलास घुगे यांनी गावच्या विकासासाठी सरकार दरबारी प्रयत्न करत सतत पाठपुरावा करून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक शालेय योजना बद्दल माहिती देऊन ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण तोड थांबवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावकर्‍यांनी सजग राहून आपल्या गावातील कोणताही मुलगा मुलगी स्थलांतरित होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जिल्हा कार्यक्रमाधिकारी ओमप्रकाश गिरी व ऊसतोड कामगार कृती समितीचे निमंत्रक बाजीराव ढाकणे , समुदाय संघटक बाजीराव गिरी यांनी केले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय बोरफडी ,शाळा व्यवस्थापन समिती बोरफडी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. याप्रसंगी गावातील महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

COMMENTS