Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहटादेवी देवस्थान येथे ‘निधी आपके निकट’ शिबीर उत्साहात

पाथर्डी : श्री मोहटादेवी देवस्थान मोहटे येथे ‘निधी आपके निकट’ कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या   जिल्हा स्तरीय शिबीराचे आयोजन सोमवारी (दि.२७)  करण्यात आले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विशेष जनजागृती आणि तक्रार निवारण मोहिमेअंतर्गत, भविष्य निर्वाह निधीशी संबंधित विविध समस्यांचे शिंबीरामध्ये जागेवरच निराकरण करण्यात आले. यावेळी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सुरेंद्र कुलकर्णी प्रवर्तक अधिकारी,  सचिन लांडे सहाय्यक सुरक्षा अधिकारी, ओम पिंपरकर सहाय्यक तसेच देवस्थानचे मुख्य कार्यकारी सुरेश भणगे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सभासद, विविध आस्थापनांचे कामगार, प्रतिनिधी सेवानिवृत्त कर्मचारी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएफ काढणे, केवायसी अपडेट करणे, ई-नॉमिनेशन आणि पेन्शन संबंधित तांत्रिक अडचणी अशा अनेक तक्रारींचे अधिकान्यांनी प्रत्यक्ष निवारण केले. नवीन ई-सेवा पोर्टलचा वापर कसा करावा, उमंग ऍप द्वारे पीएफची माहिती कशी मिळवावी, आणि उच्च पेन्शन पर्यायाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कोपरगावमध्ये महाराष्ट्र दिनी वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण 
ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक
दहावी परीक्षेत जगदंबा विद्यालयाचे यश 

पाथर्डी : श्री मोहटादेवी देवस्थान मोहटे येथे ‘निधी आपके निकट’ कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या   जिल्हा स्तरीय शिबीराचे आयोजन सोमवारी (दि.२७)  करण्यात आले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विशेष जनजागृती आणि तक्रार निवारण मोहिमेअंतर्गत, भविष्य निर्वाह निधीशी संबंधित विविध समस्यांचे शिंबीरामध्ये जागेवरच निराकरण करण्यात आले.

यावेळी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सुरेंद्र कुलकर्णी प्रवर्तक अधिकारी,  सचिन लांडे सहाय्यक सुरक्षा अधिकारी, ओम पिंपरकर सहाय्यक तसेच देवस्थानचे मुख्य कार्यकारी सुरेश भणगे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सभासद, विविध आस्थापनांचे कामगार, प्रतिनिधी सेवानिवृत्त कर्मचारी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएफ काढणे, केवायसी अपडेट करणे, ई-नॉमिनेशन आणि पेन्शन संबंधित तांत्रिक अडचणी अशा अनेक तक्रारींचे अधिकान्यांनी प्रत्यक्ष निवारण केले. नवीन ई-सेवा पोर्टलचा वापर कसा करावा, उमंग ऍप द्वारे पीएफची माहिती कशी मिळवावी, आणि उच्च पेन्शन पर्यायाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

COMMENTS