Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

नांदेड : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नांदेड येथील विभागीय गट कार्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती ‘ज्ञान दिन’ म्हणू

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पाथर्डीत विविध उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहूर येथे खीरदान कार्यक्रम उत्साहात
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले

नांदेड : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नांदेड येथील विभागीय गट कार्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती ‘ज्ञान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक समता सप्ताहाचा समारोपही करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात  राज्य शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी शाहीर ड. सतिश राऊतखेडकर यांनी शाहिरी, पोवाडे व गीतांच्या माध्यमातून उपस्थितांना प्रेरित केले. या कार्यक्रमाला केंद्र प्रमुख विलास मेंडके, शेषराव फाळके, प्रसाद शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी बोलताना  मिसलवाड यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी विविध देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. अत्यंत कठोर परिश्रम घेऊन त्यांनी देशाला एकसंघ ठेवणारे संविधान दिले, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मेंडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना शिवनखेडकर, मंदा कोकरे, अरुणा गिरी, उषा गवई व नामदेव तायडे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS