Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढला; श्रीरामपूर, शिर्डी कोपरगावमध्ये तापमानाने ओलांडली चाळीशी!

https://www.youtube.com/watch?v=P5vNQg5V5Hk अहिल्यानगर जिल्ह्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे! उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्याचा पारा

राहाता शहरात समता परिषदेचा जनजागृती रथ दाखल
शारदा संकुलात डॉ. आंबेडकरांना अभिवादन  
महापुरुषांना जातीत अडकवू नका : शहाजी डोके

अहिल्यानगर जिल्ह्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे! उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्याचा पारा चढला असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी आणि कोपरगावमध्ये उष्णतेचा तडाखा सर्वाधिक जाणवत आहे. या शहरांमध्ये तापमानाने चक्क चाळीशी ओलांडली असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे कठीण झाले असून उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळावे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

COMMENTS