Homeताज्या बातम्या

बीड शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भगवान सोनवणे यांच्याकडे

शिवसेना अल्पसंख्याक विभागाकडून विशेष सत्कार बीड: बीड जिल्हा शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार मा. भगवान सोनवणे यांनी स्वीकारल्यानंतर शिवसेना

राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीला मोठे यश; उपमुख्यमंत्री सुमित्राताई अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित

शिवसेना अल्पसंख्याक विभागाकडून विशेष सत्कार

बीड: बीड जिल्हा शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार मा. भगवान सोनवणे यांनी स्वीकारल्यानंतर शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाप्रमुख मोहम्मद अझरुद्दीन उर्फ ए.एस. गोलू यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी झालेल्या बैठकीत बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांना भेडसावणार्‍या विविध समस्या, शैक्षणिक अडचणी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासंबंधी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याबाबतही चर्चा झाली.

याप्रसंगी ए.एस. गोलू यांनी भगवान सोनवणे यांना शुभेच्छा देताना सांगितले की, सोनवणे साहेब हे अनुभवी व अभ्यासू अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल. तसेच अल्पसंख्याक शाळांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे. सत्कार प्रसंगी उपस्थितांनी सोनवणे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS