पुत्रप्रेम की सत्तेची भूक !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पुत्रप्रेम की सत्तेची भूक !

शिवसेनेचे आक्रमक चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती, ते रामदास कदम यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कडवी टीका करत चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र कदम या

अन्यथा मरण अटळ
काँगे्रसचे बुडते जहाज
ज्ञानाची दारे उघडतांना…

शिवसेनेचे आक्रमक चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती, ते रामदास कदम यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कडवी टीका करत चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र कदम यांची ही टीका पूत्रप्रेमातून आली की, सत्तेची भूकेतून आली, याची मिमांसा करणे गरजेचे आहे. नारायण राणे यांनी ज्यावेळेस शिवसेनेतून बंड केले त्यावेळेस, राणे यांच्यासारख्या आक्रमक व्यक्तीला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना पुढे केले. कदम यांना फक्त पुढेच केले नाही, तर त्यांना विधीमंडळात, विरोधी पक्षनेते पद, त्यांनतर सत्ता आल्यानंतर पुन्हा मंत्रीपद, औरंगाबादचे पालमंत्रीपद अशी कितीतरी पदे शिवसेनेने कदम यांच्या पारडयात टाकली. बरे कदम काही विकासपुरूष नाहीत. किंवा स्मरणात राहतील अशी मोठी विकासकामे त्यांनी कोकणात केली नाही. तर फक्त राणे यांना शह देण्यासाठी सर्व ताकद तेव्हा शिवसेनेने कदम यांना पुरवली हे उघड आहे. कदम यांनी फक्त राणे यांच्यावर टीकची झोड उठवत कोंबडी चोर उल्लेख करत आपली आक्रमकता दाखवली होती. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना मंत्रीपदे, विरोधीपक्ष नेतेपद मिळाले. मात्र त्यानंतर 2019 मध्ये अनवधनाने महाविकास आघाडी स्थापन झाली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. एकतर तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मंत्रीपद कुणाला द्यायची हा तिढा सोडवण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी गेला. त्यानंतर निवडक लोकांना मंत्रीपदे देण्यात आली. मंत्रिपदांचे वाटप करतांना शिवसेनेचे ज्येष्ठांना डावलल्याने त्यांच्यात असंतोष वाढत होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी या आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करण्याची उघड भाषा केली होती. तर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी संयम दाखवला. मात्र हा संयम कदम यांना दाखवता आलेला नाही. कोणत्याही पक्षात जोपर्यंत आपली उपयुक्तता आहे, तापर्यंत आपल्याला पदे मिळत जातात. मात्र आपली उपयुक्तता संपली, तेव्हा आपल्याला अलगद बाहेरचा रस्ता दाखवला जातो. हा नैसर्गिक नियम आहे. तो नियम कदाचित कदम विसरले असावे. मात्र कदम यांनी संयम दाखवण्याची गरज होती. मात्र मुळातच आक्रमक स्वभाव असलेल्या कदम यांना आपल्या मूळ स्वभावाला मूरड घालणे शक्य नसल्यामुळे त्यांनी टीकेची झोड उठवली. शिवाय कदम शिवसेनेतून बाहेर पडले तर, ते राणे यांच्या पथ्यावरच पडणार आहे. कारण कदम भाजपमध्ये आले तर, राणे यांचे भाजपमधील वजन वाढणार यात शंका नाही. त्यामुळे राणे यांना आपली भाजपमधील जागा पक्की करण्यासाठी कोकणात भाजप वाढवण्याचे आव्हान आहे. अशावेळी एक शिवसेनेचा आक्रमक नेता शिवसेना सोडून भाजपात डेरेदाखल होत असेल, तर ते राणे यांना हवेच आहे. वास्तविक पाहता कदम यांना शिवसेनेने भरपूर काही दिले. मात्र त्यांची धडपड ही आता मुलाचे राजकीय कारकीर्द उद्धवस्त होण्याची त्यांना वाटत असलेल्या भीतीमुळे त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली. कदम आणि राणे यांची तुला केली तर ती बहुतांशी सारखीच आहे. राणे यांना त्यांच्या दोन मुलांच्या राजकीय कारकीर्दीची भीती वाटत असल्यामुळेच, त्यांनी शिवसेना सोडणे पसंद केले. मात्र पक्ष आपल्याला स्वीकारतो, म्हणजे मुलाला स्वाकीरेल असे नाही. त्यातच राणे यांच्या मुलांचे कर्तृत्व काय, तर शून्य, तसेच कदम यांच्या मुलांचा विकासाचा दृष्टीकोन, किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात प्रभावी नसल्यामुळे, त्याला डावलले तर नवल नाही. मात्र सत्तेची भूक मोठी असते. या सत्तेच्या भूकेमुळे राजकीय पदे, आमदारकी, मंत्रीपदे आपल्या पायाशी लोळण घ्यायला हवी, किंबहुना वारसा हक्कांनी ती आपल्याच कुटुंबात यायला हवी, असा या नेत्यांचा समज असतो. त्यामुळे राजकीय नेते आपल्या उतारवयात आपल्या मुलांना, राजकीय प्रवाहात आणून त्यांना पदे देण्याचे धोरण ठेवतात. कदम यांना त्यांच्या मुलांविषयी चिंता वाटणे देखील साहजिकच आहे. कारण एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतांना, त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे देखील मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री म्हणून काम करत आहे.

COMMENTS