Homeताज्या बातम्या

पंजाबमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, १५ हून अधिक जखमी

अमृतसर : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक ज

राजधानीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार; नीट घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
देशात २४ तास कार्यरत न्यायव्यवस्थेची गरज : सरन्यायाधीश सूर्यकांत
देशात १ जूनपासून ‘एक कुटुंब, एक कनेक्शन’; एलपीजी गॅसचे नियम बदलणार!
पंजाब दुर्घटना: फिरोजपूरमध्ये अस्थी विसर्जनादरम्यान ट्रकने जीपला धडक  दिल्याने ९ ठार, १५ जखमी.. :::: Shabda Khadag

अमृतसर : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जंगा वळणाजवळ पिकअप ट्रक आणि ट्रेलर (मोठा ट्रक) यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील सुमारे ३० जण अस्थी विसर्जनासाठी पिकअप ट्रकमधून जात असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS