Homeताज्या बातम्या

संत शिरोमणी गोरोबा काका जयंतीनिमित्त नांदेडमध्ये आज भव्य शोभायात्रा; गुणवंत विद्यार्थी व समाजरत्नांचा होणार गौरव

नांदेड: कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य

अंथरवन पिंपरी तांडा येथे कृषिदूतांनी जाणून घेतल्या शेतकर्‍यांच्या गरजा; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे दिले प्रात्यक्षिक
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर अधिवेशनात लक्षवेधी मांडावी; खासदार-आमदारांना डॉ. हंसराज वैद्य यांचे आवाहन
भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! ‘ब्लू’ ऐवजी भगवा रंग; माजी कर्णधार विरेन रासकिन्हा संतापला

नांदेड: कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य शाखा, नांदेड यांच्या वतीने रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळी ८ वाजता आयटीआय चौक येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर, राज कॉर्नर, चैतन्य नगर, साईबाबा मंदिर मार्गे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, तरोडा (खु.) येथे शोभायात्रेचा समारोप होईल. शोभायात्रेत संत गोरोबा काकांचा जिवंत देखावा, भजनी मंडळे, बँड पथक, लेझीम पथक, संतांच्या जीवनावरील देखावे तसेच झेंडे-पताकांसह शेकडो समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.

दुपारी १२ वाजता श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात समाजासाठी मोलाचे योगदान देणार्‍या मान्यवरांना ‘समाजरत्न’, ‘उद्योगरत्न’, ‘समाजभूषण’ आणि ‘जीवनगौरव’ पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार यांना समाजरत्न, उद्योजक विठ्ठलराव किवळेकर यांना उद्योगरत्न, तर डॉ. सुधाकर तहाडे, पुंडलिक घुमलवाड, देविदास चिलवंतकर आणि धनराज शिरुळे यांचा विविध पुरस्कारांनी विशेष गौरव होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून राज्यसभा सदस्य अजित गोपछडे, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजुरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार आनंदराव बोंढारकर, बालाजी कल्याणकर, महापौर कविता मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नांदेड जिल्ह्यासह परिसरातील सर्व कुंभार समाज बांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष विजयराव देवडे लहानकर व स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

COMMENTS