Homeताज्या बातम्या

आरोग्याशी खेळणार्‍या व्यावसायिकांपासून सावध राहानागरिकांना एस. एम. युसूफ यांचे आवाहन

बीड : अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडाकेबाज कारवायांच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल

भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
सारथी संस्थेच्या संशोधकांकडून किल्ले धारूर येथे स्वच्छता मोहीम
तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू


बीड : अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडाकेबाज कारवायांच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाचे हातगाडे तसेच दूध विक्री करणार्‍या काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवल्याचे दिसून येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात युसूफ यांनी म्हटले आहे की, संबंधित व्यावसायिकांकडून व्यवसायासाठी आवश्यक असलेले स्वच्छता व गुणवत्ता निकष पाळले जात नसल्यानेच त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीपोटी व्यवसाय बंद ठेवण्याचा मार्ग स्वीकारला असावा. त्यामुळे नागरिकांनी अशा व्यावसायिकांबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. त्यांनी हॉटेल्समध्ये वापरले जाणारे खाद्यतेल, दूध व इतर पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच मिठाईच्या दुकानांमध्ये विक्री होणारे दुग्धजन्य पदार्थ खरोखरच शुद्ध दुधापासून तयार केले जातात का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. चहाचे हातगाडे व रस्त्यावरील दूध विक्रेते स्वच्छतेचे निकष पाळतात का, त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासली जाते का, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दूध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी होत असताना आणि लोकसंख्या वाढत असताना दुग्धजन्य पदार्थांचा वाढता पुरवठा नेमका कसा होत आहे, याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या परिस्थितीत भेसळ किंवा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा वापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. युसूफ यांच्या मते, या गंभीर प्रश्नांकडे शासन, प्रशासन आणि नागरिक या तिन्ही स्तरांवर पुरेसे लक्ष दिले जात नाही. परिणामी काही व्यावसायिक जनतेच्या आरोग्याशी खेळत असून, नागरिकांनीही अधिक जागरूक राहून दर्जेदार व विश्वासार्ह ठिकाणांहूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवायांमुळे नियमांचे पालन न करणार्‍या व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याचे दिसून येत असून, अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन एस. एम. युसूफ यांनी केले आहे.

COMMENTS