Homeताज्या बातम्या

जामखेडच्या गुणवत्तेचा लंडनमध्ये डंका! एमबीए पूर्ण केल्याबद्दल रैय्यान काझी यांचा विशेष सत्कार

जामखेड: शहरामध्ये उच्च शिक्षितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही जामखेडकरांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब ठरत आहे. नुकतेच मुस्लिम पंच कमिटीचे

शासनाच्या योजना शेवटपर्यंत पोहोचवणे हेच पुण्याचे कार्य; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगावमधील मेळाव्यात प्रतिपादन
देवळाली प्रवरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय तरुण ठार
आसाममधील पूरपरिस्थिती गंभीर; मृतांची संख्या ४४ वर, साडेसहा लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित

जामखेड: शहरामध्ये उच्च शिक्षितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही जामखेडकरांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब ठरत आहे. नुकतेच मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहरभाई काझी यांचे पुतणे व उद्योजक मजहरभाई काझी यांचे सुपुत्र रैय्यान मजहरुद्दीन काझी यांनी एमबीए पदवी यशस्वीरीत्या संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल लंडन येथे विशेष सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

रैय्यान काझी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जामखेड शहराच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या कुटुंबासह संपूर्ण जामखेडचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच जामखेड शहरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, भविष्यातही ते अशीच यशाची शिखरे गाठतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रैय्यान काझी यांचे हे यश जामखेडमधील तरुण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत असून, कठोर परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर जागतिक स्तरावरही यश संपादन करता येते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS