Homeताज्या बातम्या

आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई पायी लाँग मार्चचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाच्या विरोधात आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा या घोषणेसह सुरू झालेल्या बीड ते मुंबई पायी लाँग

उपवर्गीकरणविरोधी लाँग मार्च रोखण्याचा प्रयत्न; रांजणगावात रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात
अन्यथा १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना काळे झेंडे! हुले कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
उपवर्गीकरणाविरोधातील लढा तीव्र; पनवेल ते चेंबूर ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’



अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाच्या विरोधात आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा या घोषणेसह सुरू झालेल्या बीड ते मुंबई पायी लाँग मार्चचे लिंबागणेश येथे गुरुवारी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
दि. 10 जून रोजी बीड येथून प्रारंभ झालेला हा लाँग मार्च 26 जून रोजी मुंबई येथे पोहोचणार आहे. निळ्या झेंड्यांचा महासागर, संविधान संरक्षणाच्या घोषणा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा निर्धार यामुळे या मार्चकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजता हा मार्च लिंबागणेश येथे दाखल झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पायी लाँग मार्चमधील सहभागी आंबेडकरवादी अनुयायांचे आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सुवासिनींनी सहभागी भीमसैनिकांचे औक्षण केले. ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, भीमपुत्र प्रेम कांबळे, संदीप जाधव, ज्ञानेश्वर कवठेकर, लखन जोगदंड, धम्मा वाघमारे आदींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. गणेश ढवळे, भीम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ आणि बाळासाहेब मोरे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना आरक्षण वाचविण्यासाठी सुरू असलेल्या या न्याय्य लढ्याला लिंबागणेशसह अठरा पगड जातीतील समाजबांधवांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही या आंदोलनात सर्वतोपरी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राजेभाऊ गिरे, बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ, अरुण निर्मळ, जितू निर्मळ, औदुंबर नाईकवाडे, लखन राऊत, पप्पू आवसरे, विलास काटे, स्वप्निल निर्मळ आदींसह अनेक कार्यकर्ते पायी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते.

COMMENTS