Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेकूलच्‍या आऊटग्रो विभागाकडून सिंचन अधिक कार्यक्षम करण्‍यासाठी GWX100 लॉन्‍च  

नवीन लॉन्‍च करण्‍यात आलेले डिवाईस ८० टक्‍क्‍यांहून अधिक अचूकतेसह आजाराचा अंदाज करण्‍यास देखील साह्य करते

नाशिक -  भारतातील अग्रगण्‍य अन्‍न व कृषी-तंत्रज्ञान उद्योग वेकूलचा एआय-संचालित ‘फिजिटल’ शेतकरी सहभाग उपक्रम आऊटग्रोने आज नाशिकमध्‍ये आयओटी-सक्षम

मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटल उभारणीचा पंचनामा
मांडूळ तस्करीचा पर्दाफाश; तिघांकडून जिवंत मांडूळ हस्तगत
पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहकांकडे 12 हजार कोटीचे थकले वीजबिल

नाशिक –  भारतातील अग्रगण्‍य अन्‍न व कृषी-तंत्रज्ञान उद्योग वेकूलचा एआय-संचालित ‘फिजिटल’ शेतकरी सहभाग उपक्रम आऊटग्रोने आज नाशिकमध्‍ये आयओटी-सक्षम एआय-पॉवर्ड डिवाईस GWX100 लॉन्‍च केले. हे सेन्‍सर-आधारित डिवाईस सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांना मदत करून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण ठरवण्यास मदत करते, तसेच सिंचनासाठी योग्य वेळ देखील सांगते. GWX100 हवामान, मातीचा प्रकार, मुळांची खोली आणि वापरलेल्या सिंचन प्रणालीचे विश्लेषण करते, आवश्यक असलेल्या पाण्याच्या इष्टतम प्रमाणाचा अंदाज लावण्यासाठी तसेच रीअल-टाइम सॅटेलाइट डेटाद्वारे आजाराचा अंदाज लावण्यात मदत करते. भारतात डिझाइन, विकसित आणि उत्पादित केलेल्‍या तंत्रज्ञानाचा उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच पीक उत्पादनात २० ते ३० टक्‍के वाढ करण्याचा मनसुबा आहे. 

याप्रसंगी बोलताना फार्मर एंगेजमेंट अॅण्‍ड आऊटग्रोचे प्रमुख श्री. सेंधिल कुमार एन. म्‍हणाले, ‘‘सिंचन प्रणालीमध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी आम्ही GWX100 लॉन्‍च केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अपव्यय कमी करण्यास मदत होईल. सिंचन वेळापत्रकाच्या अभावामुळे जवळपास ६० टक्‍के सिंचन पाणी वाया जाते. देशातील बहुतेक शेतकरी त्यांच्या पिकांसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचे प्रमाण ओळखण्यासाठी संघर्ष करतात; केव्हा आणि किती सिंचन करावे हे त्यांना माहीत नाही कारण त्यांच्याकडे शेतीबाबत विशिष्ट माहिती नाही. यामुळे पीक उत्पादकता वाढते आणि उत्पन्नावर परिणाम होतो. देशातील ९२ टक्‍के भूजलाचा वापर फक्‍त शेतीसाठी केला जात असल्याने त्याचा एकूणच भूजल पातळीवरही परिणाम होतो. यासंदर्भात आऊटग्रोमध्‍ये आमच्या टीमने ‘कमी थेंबासह अधिक पीक’ घेण्याच्या उद्देशाने विद्यमान समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा महसूल वाढवण्यास मदत करण्यासोबत देशातील सिंचन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्‍याचा मनसुबा आहे. आमच्या प्रायोगिक चाचणीच्या यशामुळे आम्ही १०० शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात उपयोजित डिवाईसद्वारे मदत करण्यामध्‍ये यशस्‍वी ठरलो आहोत, तसेच आम्ही येत्या काही महिन्यांत GWX100 १००० हून अधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.’’ 

याबाबत आऊटग्रोच्‍या डिजिटल सर्विसेसचे श्री. के. ए. गोपालकृष्‍णन म्‍हणाले, ‘‘GWX100 हे शेतकऱ्यांच्‍या त्रासाबाबत जाणून घेण्‍यासाठी १६० हून अधिक शेतकऱ्यांसोबत आम्‍ही केलेल्‍या संवादांमधून निर्माण करण्‍यात आले आहे. यशस्वी वणि कार्यक्षम सिंचनामध्ये पाण्याच्या चांगल्या प्रतिधारणेसाठी स्थलाकृतिक वैशिष्ट्यांसह विविध प्रकारांचा समावेश होतो, जसे सिंचनाचे पाणी मुळांमध्ये वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी मुळांच्या सखोलतेबाबत माहिती, वेगवेगळ्या पिकांच्या वाढीच्या अवस्थेवर आधारित दैनंदिन पाण्याची गरज समजून घेणे आणि हवामान परिस्थिती. GWX100 हे अनोखे डिवाईस आहे, जे शेतकरी समुदायाच्‍या जलस्रोत व्यवस्थापन समस्या सोडवण्यासाठी वर नमूद केलेल्या मुद्द्यांचा विचार करते.’’ 

इंग्रजी आणि तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी व हिंदी या ५ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या GWX अॅपद्वारे शेतकरी त्यांच्या संबंधित स्थानिक भाषेत डिजिटली ट्रॅक करू शकतात, तसेच माहिती मिळवू शकतात. या नवोपक्रमाद्वारे आऊटग्रोचा कृषी क्षेत्रात, विशेषत: संसाधन व्यवस्थापनाकडे कार्यक्षमता वाढवण्याचा मनसुबा आहे आणि नजीकच्या भविष्यात २० हून अधिक पिकांपर्यंत डिवाईसचे प्रमाण वाढवण्याची योजना आखत आहे.

वेकूल बाबत: वेकूल फूड्स भारतातील अग्रगण्‍य अन्‍न व कृषी-तंत्रज्ञान उद्योग आहे. अन्‍न विकास व वितरणावर लक्ष केंद्रित करणारी कंपनी नवान्‍मेष्‍कारी तंत्रज्ञानाचा फायदा घेत कृषी उत्‍पादनापासून विक्रीपर्यंत गुंतागूंतीची पुरवठा साखळी वाढवते व ऑपरेट करते. आपली तंत्रज्ञान शाखा सीईएनएसएच्‍या माध्‍यमातून कंपनी संपूर्ण अन्‍न व कृषी पुरवठा साखळीमधील पारदर्शकता व सर्वोत्तमतेसाठी एकीकृत कोअरसह फार्म टेक, प्रोक्‍यूरमेंट टेक, प्रोसेसिंग अॅण्‍ड वेअरहाऊसिंग टेक, डिस्ट्रिब्‍युशन टेक, कंझ्युमर टेक आणि फिन टेक या सहा व्‍हर्टिकल्‍समध्‍ये सानुकूल सास (SAAS) सोल्‍यूशन्‍स म्‍हणून तंत्रज्ञान उत्‍पादने देते. आपला शेतकरी सहभाग उपक्रम आऊटग्रोच्‍या माध्‍यमातून कंपनी २,००,००० हून अधिक शेतकऱ्यांसोबत सहयोगाने काम करते. वेकूल फ्रेश प्रॉड्युस, स्‍टेपल्‍स व डेअरी अशा विविध माध्‍यम व श्रेणींमध्‍ये फुल स्‍टॅक, व्‍यापक उत्‍पादन श्रेणीचे कार्यसंचालन करते आणि जनरल ट्रेड, आधुनिक ट्रेड व फूड सर्विसेस क्षेत्रातील १,६५,००० हून अधिक क्‍लायण्‍ट्सना सेवा देते. वेकूलच्‍या कंझ्युमर ब्रॅण्‍ड्स बास्‍केटमध्‍ये मधुरम, किचनजी, एल’एक्‍झोटिक, डेझी फ्रेश, फ्रेशीज, ऑलफ्रेश आणि जस्‍ट पोटेट यांचा समावेश आहे. 

आऊटग्रो बाबत: आऊटग्रो हे ४ मार्च २०२० रोजी स्‍थापित करण्‍यात आलेले वेकूलचे एआय संचालित ‘फिजिटल’ शेतकरी सहभाग व्‍यासपीठ आहे. आऊटग्रो अॅपचे २ लाखांहून डाऊनलोड्स आहेत. कृषी-डॉक्‍टरांच्‍या टीमचे पाठबळ असलेले आऊटग्रो १५०००० हून अधिक शेतकऱ्यांना सर्वसमावेशक सल्‍ला व सानुकूल सोल्‍यूशन्‍स देते. आऊटग्रो अॅप तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्‍ट्र, आंध्रप्रदेश व तेलंगणामधील शेतकरी नेटवर्कसाठी आरोग्यावरील पीक माहिती, स्वयंचलित माती परीक्षण, हवामान स्थिती रिअल-टाइम मंडी किंमत आणि समग्र कृषी सल्ला यांसारख्या सेवा देते.

COMMENTS