Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट वन विभागाची ’सिंघम’ स्टाईल कारवाई; सागवान तस्करी करणारा पिकअपसह आरोपी जेरबंद

किनवट : प्रकल्प विभाग किनवट आणि वनविकास महामंडळ शिवणी यांच्या संयुक्त पथकाने डोंगरगाव ते इस्लापूर मार्गावर धाडसी कारवाई केली आहे. चंद्रभागा हॉटेल

पुण्यात चक्क बस चोरून सुसाट पळवली
मणिपूरमध्ये शस्त्र 1800 किलो अफूसह दोघे जेरबंद
भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; 10घरफोड्या उघड – 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

किनवट : प्रकल्प विभाग किनवट आणि वनविकास महामंडळ शिवणी यांच्या संयुक्त पथकाने डोंगरगाव ते इस्लापूर मार्गावर धाडसी कारवाई केली आहे. चंद्रभागा हॉटेलजवळ फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सागवान लाकडाने भरलेला पिकअप आणि एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 2.5 ते 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विभागीय व्यवस्थापक, वन प्रकल्प विभाग किनवट व सहाय्यक व्यवस्थापक किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती. जलधारा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बी. बी. संदुपटलवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. चोले यांना सागवान तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार डोंगरगाव ते इस्लापूर रस्त्यावर चंद्रभागा हॉटेलजवळ वनविभागाच्या पथकाने सापळा रचला. संशयास्पद पिकअप दिसताच वनविभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग केला आणि सिनेस्टाईलने गाडी अडवून मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत वनविभागाने 13 नग सागवान आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली पिकअप गाडी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी एका आरोपीलाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही धडक कारवाई यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी बी. बी. संदुपटलवार व एस. एन. चोले यांच्यासह वनपाल पवार मॅडम, नागरगोजे, वनरक्षक बी. एस. वडजे, एल. जी. हमपल्ले, एम. एम. पाडदे, मोरताडे, सोमासे, केंद्रे, हाळे, मिसे आणि शेळके मामा इत्यादी कर्मचार्‍यांच्या पथकाने परिश्रम घेतले.

COMMENTS