Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी मदतनीस वर 1 वर्षांपासून अत्याचार

केज : तालुक्यातील एका खेडेगावातील 30 वर्षीय अंगणवाडी मदतनीस हिला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्या नंतर तीचे फोटो, आणि व्हीडिओ काढले. व

दिंडोरीत ACB ची मोठी कारवाई! वेतनश्रेणीच्या बिलासाठी लाचेची मागणी!
राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील लांडे खून प्रकरण

केज : तालुक्यातील एका खेडेगावातील 30 वर्षीय अंगणवाडी मदतनीस हिला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्या नंतर तीचे फोटो, आणि व्हीडिओ काढले. व हे फोटो आणि व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन एक वर्षांपासून कळंब, केज येथील विविध लॉजवर व पीडितेच्या गावी बळजबरीने एक वर्षांपासून बलात्कार केल्याच्या पीडितेने दिलेल्या फिर्यादी वरून विकास लक्ष्मण खाडे रा संभाजीनगर, कळंब याच्या विरुद्ध युसूफ वडगाव पोलिसात गून्हा नोंद झाला आसून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
केज तालुक्यातील एका खेडेगावात अंगणवाडी मदतनीस म्हणुन कार्यरत आसलेल्या 30 वर्षीय महिलेची कळंब येथील संभाजीनगर येथे राहणार्‍या विकास लक्ष्मण खाडे याच्याशी ओळख झाली. त्यातून जवळीकता वाढत गेल्यामुळे ऐकेदिवासी आरोपीने पिडीत महिलेला लस्सी मधून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्यानंतर तीचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हीडिओ काढले. व तिच्यावर कळंब येथील बालाजी लॉज, प्रेरणा लॉज, केज येथील सागर /प्रताप लॉज, आणि पीडितेच्या गावी मे 2025 ते 22 एप्रिल 2026  रात्री साडे नव वाजण्या च्या दरम्यान या कालावधीत  फोटो व व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी व जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बळजबरीने अत्याचार व बलात्कार केल्याची फिर्याद पिडीत महिलेने दिल्या वरून विकास लक्ष्मण खाडे, रा सभाजीनगर, कळंब याच्या विरुद्ध युसूफ वडगाव पोलिसात गून्हा नोंद झाला आसून सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी पीडितेच्या गावी जाऊन चौकशी केली. याप्रकारणी पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे हे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS