Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंथन परीक्षेत अस्मिता उंडे हिचे यश

श्रीगोंदा : तालुक्यातील मढेवडगाव येथील उंडेमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी अस्मिता प्रदीप उंडे हिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने २१२ गुण मिळवत तालुका गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.स्मिता ही रयतसेवक डॉ. प्रदीप जगदेव उंडे यांची कन्या असून तिच्या या यशामागे तिची मेहनत व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तिला वर्गशिक्षक रामदास ठाकर आणि संतोष इंगावले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.अस्मिताच्या या यशाबद्दल लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच सुनीता उंडे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज सुपेकर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मोफत गणवेश योजनेत महत्त्वपूर्ण बदल; १०० टक्के पॉलिस्टर कापडावर बंदी
आढळगाव शाळेला नवे वर्ग; वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २४ लाखांची मंजुरी
स्वामित्व योजनेतून शाळांच्या मालमत्तेला मिळणार कायदेशीर कवच; जिल्ह्यातील 100 मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

COMMENTS