Homeताज्या बातम्या

परिक्रमा पॉलिटेक्निकतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथील  बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा पॉलीटेक्निक महाविद्यालयाने यंदाच

खा. नीलेश लंके यांची प्रकृती बिघडली
पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात
 सुभद्रा फलके यांचे निधन


श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथील  बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा पॉलीटेक्निक महाविद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या शाळेत जाऊन सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. श्रीगोंदा, दौंड आणि शिरूर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संबंधित शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
दौंड, कुरकुंभ, जलालपूर, बेलवंडी, गोपाळवाडी, काष्टी, श्रीगोंदा, अजनूज, देऊळगाव राजे, बाभूळसर, टाकळी लोणार, येळपणे, मढेवडगाव, निमगाव खलू आदी भागांतील शाळांमध्ये जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळांचे नाव उंचावल्याबद्दल शिक्षक व मुख्याध्यापकांचेही अभिनंदन करण्यात आले.
यामध्ये श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा येथील पूर्वा युवराज रणसिंग (98.20 टक्के), ज्ञानदा लक्ष्मण शेंडे (97.60 टक्के) व संस्कृती नंदकुमार गायकवाड (97 टक्के), तसेच खंडेश्वर माध्यमिक विद्यालय, येळपणे येथील प्रसाद सोन्याबापू कळमकर (96 टक्के) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालयातील देवयानी ज्ञानेश्वर माने (96 टक्के) यांसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
यावेळी परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक माजी मंत्री बबनराव  पाचपुते, अध्यक्षा डॉ. प्रतिभा पाचपुते, सचिव आमदार विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ऍड. प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा हा उपक्रम सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत ठरत असून विद्यार्थ्यांना नवे ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देणारा ठरत आहे.

COMMENTS