Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अफवांना पूर्णविराम : नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत विविध अफवा वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण न

‘नांएसो’मध्ये शांत धक्का; अध्यक्ष डॉ. काब्दे पायउतार, प्रश्‍न अनुत्तरितच; घाई गडबडीमध्ये प्राचार्य पदाच्या मुलाखतीमुळे काब्दे झाले होते नाराज!
राष्ट्रीय महामार्गाच्या अतिक्रमण विरोधी विभागचे अंबाई हॉटेला बुलडोझर लावले; आठ दिवसांत आसना ते अर्धापूर तालुक्याची हद्द अतिक्रमण मुक्त करू- राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी
किनवट बाजार समितीत 34 लाखांचा ’सोयाबीन घोटाळा’?शेतकर्‍यांचे पैसे लांबवल्याने संताप; गोडाऊन सील!

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत विविध अफवा वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुढाकार घेत जिल्हावासीयांना स्पष्ट दिलासा दिला असून, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, असे ठामपणे सांगितले आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आणि अधिकृत सोशल मीडिया संदेशाद्वारे सध्याची परिस्थिती स्पष्ट करताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व प्रमुख इंधन डेपोमधून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा नसून, पुढील काही दिवसांसाठी पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अफवांच्या परिणामस्वरूप शहरातील काही भागांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. अनेकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. अनावश्यक साठवणूक टाळावी, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. राहुल कर्डिले यांनी यावेळी सोशल मीडियावर पसरत असलेल्या अप्रमाणित संदेशांबाबतही नागरिकांना सावध केले. इंधन संपणार, पुरवठा खंडित होणार अशा प्रकारचे मेसेज पूर्णपणे निराधार आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणाले. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. याचबरोबर, विनाकारण अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणार्‍यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करत, चुकीची माहिती पुढे पाठवू नये, असेही नागरिकांना बजावण्यात आले आहे. एकूणच, जिल्ह्यात इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी संयम राखणे आणि अफवांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

COMMENTS