श्रीगोंदा : नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेडगाव येथील ज्येष्ठ शिक्षक रामभाऊ जांभळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ सोमवारी (दि.२०) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सूर्यवंशी होते. प्रारंभी जांभळे सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समारंभात शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत जांभळे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी शाळेच्या उभारणीपासून ते विकासापर्यंत दिलेल्या मोलाच्या योगदानाची सर्वांनी विशेष दखल घेतली. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. ग्रामस्थांनीही आपल्या भावना व्यक्त करत जांभळे सरांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पिढ्या घडल्या असून, त्यांच्या कार्याचा ठसा दीर्घकाळ स्मरणात राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या प्रसंगी लक्ष्मण रसाळ, भीमराव बेलेकर, किसन बेलेकर, विजय रसाळ, डॉ.अमोल झेंडे ,शाहूराज भोपळे, देविदास रसाळ, आप्पासाहेब भोसले, मोहन शेळके, अजित शेळके, चैत्राली शेळके (जांभळे), तुकाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, शंकर मांडगे, भगवान चव्हाण, आशा चव्हाण आदींसह ग्रामस्थ, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप जांभळे सरांच्या भावनिक मनोगताने झाला. त्यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

COMMENTS