Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिकारांविना ग्रामपंचायत प्रशासक निष्क्रियविकासकामे ठप्प; अधिकार द्यावेत किंवा अधिकारी प्रशासक नेमण्याची ग्रामस्थांची मागणी

 श्रीरामपूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंच व सदस्य यांचे प्रशासक मंडळ कार्यरत आहे. मात्र उच्च न्यायालयाने या मंडळास कोणतेही आर्थिक अधिकार दिलेले नाहीत. यामुळे सदर मंडळास ग्रामस्थांच्या अडचणी सोडविता येत नसून  प्रशासक मंडळाची म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.विकास कामे ठप्प झाल्याने प्रशासक मंडळास हाकनाक ग्रामस्थ्यांची नाराजी पात्करावी लागत आहे. त्यामुळे न्यायालयाने प्रशासकबाबत सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी प्रशासक मंडळ नेमलेल्या गावातील ग्रामस्थानकडून होत आहे.राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले गेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात न्यालयाच्या आदेशापूर्वीच विद्यमान सरपंच व सदस्य यांचे प्रशासकीय मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले. तथापि, या प्रशासकीय मंडळास धोरणत्मक व आर्थिक निर्णयाचे अधिकार दिले नाहीत. यामुळे हे मंडळ असून नसल्यासारखे आहे. अधिकार प्रदान केले नसल्याने गावातील विकास कामे ठप्प झाली आहेत. याचा रोष प्रशासक मंडळास पत्करावा लागत आहे. यामुळे सरपंच व सदस्य मंडळाऐवजी अधिकारी प्रशासक म्हणून नेमावेत अशी मागणी होत आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीप्रश्न तीव्र होत आहे.पाईपलाईन दुरुस्ती आदी कामे करावी लागतात. याशिवाय रस्ते , गटारी यांची कामे प्रलंबित आहेत. पण न्यायालया च्या  आदेशामुळे ही अत्यावश्यक कामे करता येत नाहीत. त्यामुळे हकनाक प्रशासकीय मंडळास नाराजीला सामोरे जावे लागत आहे. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन एकतर प्रशासक मंडळास अधिकार द्यावेत अन्यथा प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी होत आहे.अधिकार नसलेले बिनकामाचे प्रशासक मंडळावर काम करण्याची आमची इच्छा नसून न्यायालयालने याचा त्वरित सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आता नियुक्त प्रशासक मंडळाकडूनच केली जात आहे

टाकळी कडे येथे म. फुले यांची जयंती उत्साहात
पिंगेवाडीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन  
ग्रामपंचायतींमधील 7 हजार जागांसाठी 21 डिसेंबरला पोटनिवडणूक

COMMENTS