Homeताज्या बातम्या

बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूअल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा.  

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी केंद्र शासनामार्फत बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज

नियमभंग महागात; नगरपालिका व वाहतूक पोलिसांचा अतिक्रमणावर दणका
जोशीज् मॅथ्स क्लासेसमध्ये ‘कौतुकायन ’कॉम्रेड्स मॅरेथॉन वीरांचा गौरव व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार उत्साहात
देवाभाऊंचे शेतकर्‍यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा!जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन; डॉ. गणेश ढवळे यांचा शासनावर निशाणा
Supreme Court : बालगुन्हेगारही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करू शकतात का? सुप्रीम कोर्ट निर्णय देणार



अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी केंद्र शासनामार्फत बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ केवळ मुलींनाच मिळणार असून पात्र विद्यार्थिनींनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत 9 वी व 10 वी मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना 5,000, तर 11 वी व 12 वी मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना 6,000 इतकी वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारी विद्यार्थिनी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा पारशी या अधिसूचित अल्पसंख्याक समाजातील असणे आवश्यक आहे. तसेच मागील इयत्तेत किमान 50 टक्के गुण मिळालेले असावेत आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असावे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अर्ज प्रक्रिया 1 जून 2026 पासून सुरू झाली असून 31 ऑक्टोबर 2026 ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी आवश्यक कागदपत्रांसह राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (छडझ) वर ऑनलाइन अर्ज करावा. विद्यार्थिनींनी या महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही संधी साधावी, असे आवाहन ब्राईट सोशल फाउंडेशन बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS