खंडाळा शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत राष्ट्रवादीचे निवेदन

Homeमहाराष्ट्रसातारा

खंडाळा शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत राष्ट्रवादीचे निवेदन

खंडाळा शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंडाळा शहर यांच्या वतीने खंडाळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांना निवेदन देण्यात आले आहे.

जलजीवन मिशन योजनतेतील कामांमध्ये घोटाळा
दादा पाटील महाविद्यालयात गुणवंत कलाकारांचा सन्मान 
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व एसी बंद

लोणंद / वार्ताहर : खंडाळा शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंडाळा शहर यांच्या वतीने खंडाळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना निर्णय अपेक्षित असल्याचे निवेदनात म्हटलेलं आहे. माजी उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, पाणी पुरवठा समितीच्या माजी सभापती सुप्रिया गुरव, नगरसेविका उज्वला संकपाळ, प्रशांत देशमुख, शैलेश गाढवे, तेजस गाढवे, सुप्रिया वळकुंदे, अशोक आबा धायगुडे, सुधाकर खंडागळे, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह इतरांनी या प्रश्‍नी दखल घ्यावी म्हणून निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

दिलेल्या निवेदनात सविस्तर असे सांगण्यात आलेले आहे की, खंडाळा शहरातील पाणी पुरवठा सद्यस्थितीत नियोजन शून्य आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या उदासिनतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी एमएसईबी जवळील जुनी झालेली पाण्याची टाकी पाडण्यात आली.त्यापूर्वी शहरातील त्या टाकीद्वारे पाणी पुरवठा होणार्‍या भागातील पाण्याचे नियोजन अपेक्षित होते. आज इतका कालावधी उलटून गेला तरी नवीन पाण्याची टाकी नियोजित नाही किंवा तसा प्रस्ताव ही करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही भागात पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी नळांना येतच नाही. तसेच शहरात चालू असलेल्या रस्ते व इतर कामामुळे पाईप लाईनचे नुकसान व मोडतोड होत असते. त्यामुळे पाणी पुरवठयाचे नियोजन होत नाही. याबाबत तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे. पाईपलाईनच्या लिकेजमुळे रस्त्यावर पाणी वाया जात आहे.अशामुळे शहरात काही ठिकाणी बकालपणा येत आहे. नागरिकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मानवनिर्मित पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाडलेल्या टाकीला पर्यायी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय व्हावा, असे निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS