Homeताज्या बातम्या

विड्यात परम सेवा फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे मोफत वाटपसंतांच्या विचारांचा वारसा आणि आधुनिक शिक्षणाची जोड गरजेची – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज शास्त्री विडेकर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देणे आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत उपलब्ध करून देणे, या उद्देशाने पर

चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
मायबाप सरकार प्रकाशदादा, विजयसिंह पंडित राजे चिमुकल्यांवर दया करा…..झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे
अजित भेंडेकर साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजराशेख वसीम यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देणे आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत उपलब्ध करून देणे, या उद्देशाने परम सेवा फाऊंडेशनच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. येथील लोकनेते ज्ञानेबा (गुरुजी) विडेकर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. श्रीराम महाराज विडेकर हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज शास्त्री विडेकर लाभले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय उपयोगी वस्तू मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज शास्त्री विडेकर म्हणाले की, वारकरी शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणारे खरे जीवनशिक्षण आहे. आजच्या युगात संतांच्या विचारांचा वारसा जपत असतानाच त्याला आधुनिक शिक्षणाची जोड मिळाल्यास विद्यार्थी देशाचे आदर्श नागरिक बनू शकतात. पुढे बोलताना त्यांनी परम सेवा फाऊंडेशनच्या या सामाजिक जाणीवेचे मनःपूर्वक कौतुक केले व आभार मानले. भविष्यातही फाऊंडेशनच्या वतीने अशाच प्रकारच्या समाजोपयोगी, शैक्षणिक व संस्कारक्षम उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सामाजिक उपक्रमासाठी परम सेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संध्या पवार, ज्योती चव्हाण, बालासाहेब पटाईत, भूषण हरवाळकर, निलेश कागदे, संदीप आमटे, सागर चव्हाण, सायली महाले, धनश्री ढोले आणि वर्षा पटाईत यांचा समावेश होता. तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील मान्यवर व ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये केशवराव देशमुख, भारत देशमुख, बबन देशमुख (सर), चंद्रसेन पटाईत, चंद्रकांत घुटे, मदन देशमुख, वैद्य (मामा), किरण शिंदे आणि तुकाराम पटाईत यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. परम सेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे विडा परिसरामध्ये सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंदच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

COMMENTS