Homeताज्या बातम्या

तीन वेळा सीटीईटीउत्तीर्ण शिक्षिका मसरत सुलताना अन्सारी यांना ‘क्रांतीज्योती फातिमा शेख स्मृती राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका 2026’ पुरस्कार जाहीर

बीड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणवंत शिक्षिका मसरत सुलताना अन्सारी यांना ‘क्रांतीज्योती फातिमा शेख स्मृती राज्यस्तरीय आदर्

‘विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेत ‘आत्मा मालिक’चा दबदबा
मंथन परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश  
‘शताब्दी दीपस्तंभ’ राज्यस्तरीय पुरस्काराने अमोलक संस्था सन्मानित;सरपंच परिषदेकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


बीड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणवंत शिक्षिका मसरत सुलताना अन्सारी यांना ‘क्रांतीज्योती फातिमा शेख स्मृती राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका 2026’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन वेळा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची व मेहनतीची छाप उमटवली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान त्यांच्या समर्पित शैक्षणिक प्रवासाला नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मसरत सुलताना अन्सारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना भावी शैक्षणिक कार्यासाठी आणि समाजहिताच्या सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS