2026 च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुनर्क्षिण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला असून 234 बीएलओ हे 1 महिन्यात घरोघरी जाऊन पडताळणी करणार

2026 च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुनर्क्षिण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला असून 234 बीएलओ हे 1 महिन्यात घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यामध्ये केज तालुक्यातील 2 लाख 10 हजार 956 मतदाराची माहिती यावेळी अद्यावत होणार आहे.
केज येथे एसआयआर कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या पुनर्क्षिण व अद्यावतीकरण कार्यक्रम सुरू झाला असून बुधवार रोजी उपविभागीय अधिकारी आंबेजोगाई, दीपक वजाळे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी शुभम पवार, नायब तहसीलदार (महसूल-2) अशोक भंडारे आणि निवडणूक विभाग तहसील कार्यालय केजचे संगणक परिचालक मुबारक शेख यांनी बुधवार रोजी दुपारी केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांच्या निवासस्थानी तर दुपारनंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पवनसुत निवासस्थानी भेट घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्क्षिण अभियान राबवले जात आहे. या अभियाना अंतर्गत केज तालुक्यातील 2लाख 10 हजार 956 मतदारांची संपूर्ण माहिती अद्यावत केली जाणार आहे. मंगळवार दिनांक 30 जुन रोजी या अद्यायनास प्रारंभ झाला असून दिनांक 30जुलै पर्यंत 234 बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, दिपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व केज तहसीलचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी आणि नायब तहसीलदार (महसूल-2) अशोक भंडारे तसेच नायब तहसीलदार (निवडणूक) फुलचंद हांगे यांच्या नियोजनात हे अभियान युद्धपातळीवर राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून मतदार यादीतील मतदारांच्या माहिती संदर्भातील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत.मृत, स्थलांतरित, अपात्र अथवा अवैध मतदारांची नावे यादीत समाविष्ट असतील तर अशा मतदारांची खात्रीशीरपणे पडताळणी करून नावे वगळण्यात येणार आहेत. येत्या काळात अत्यंत अचूक मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.बीएलओ म्हणून अधिकाधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदारास दोन फॉर्म दिले जात असून एका फार्ममध्ये आवश्यक माहिती भरून घेतली जात आहे. बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी, दिपक वजाळे नायब तहसीलदार महसूल-2 अशोक भंडारे आणि निवडणूक विभाग तहसील कार्यालय केजचे संगणक परिचालक श्री मुबारक शेख आदीने फुलेनगर भागात भेट देऊन बीएलओ यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी समस्त अधिकारी,कर्मचारी यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते हारुणभाई इनामदार, शाहरुख पटेल, श्रीमती बोठे मॅडम, ज्ञानेश्र्वर चौरे तसेच यादी भाग क्रमांक 280 चे बीएलओ अमोल वाघमारे यादी भाग क्रमांक 279 चे बीएलओ संभाजी शिनगारे, यादी भाग क्रमांक 273 चे बीएलओ प्रदीप गुळभिले यांनी केज शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या निवासस्थानी भेट देऊन सदर कार्यक्रमा अंतर्गत आवश्यक एनुमेरेशन फॉर्म चा भरणा करून घेऊन केज तालुक्याचे प्रत्यक्ष डीजीटेझेशन च्या कामास सुरुवात केली.
अचूक माहिती देऊन बीएलओंना सहकार्य करावे.
मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक आणि अद्ययावत असणे ही निपक्ष लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या भागातील बीएलओंना आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावेत. चुकीची अथवा अपूर्ण माहिती देऊ नये. पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी या विशेष सखोल पुनर्क्षिण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा.
-उपविभागीय अधिकारी आंबेजोगाई, दीपक वजाळे

COMMENTS