बीड : जिल्ह्यातील इमाव (जइउ), विमाप्र (डइउ) व विजाभज (तगछढ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणासा

बीड : जिल्ह्यातील इमाव (जइउ), विमाप्र (डइउ) व विजाभज (तगछढ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी (बिगर व्यावसायिक / व्यावसायिक अभ्यासक्रम) शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासाठी दि.07 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डी. बी. क्षीरसागर यांनी दिली आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी हीींिीं://हारी.ारहरळीं.ेीस या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत आणि वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृह प्रवेशासाठी महत्त्वाच्या अटी: या योजनेसाठी केवळ बीड नगरपरिषद हद्दीपासून 10 किलोमीटर अंतरामधील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत. प्रथम वर्षाला (1ीीं धशरी) व थेट द्वितीय वर्षाला (ऊळीशलीं 2पव धशरी) प्रवेश घेतलेले विद्यार्थी या वसतिगृह योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. बीड तालुका वगळता जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या वसतिगृहासाठी अर्ज करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी मुलांचे वसतिगृह गृहपाल (9604667615) आणि मुलींचे वसतिगृह गृहपाल ( 9325333325) यांच्याशी संपर्क साधावा.

COMMENTS