अंबाजोगाई : अंटार्क्टिका म्हणजे मंत्रमुग्ध करणारी अद्भुत सफर असल्याचे मत मधुबाला जोशी (चिंचाळकर) यांनी व्यक्त केले त्या योगेश्वरी शिक्षण संस्था स

अंबाजोगाई : अंटार्क्टिका म्हणजे मंत्रमुग्ध करणारी अद्भुत सफर असल्याचे मत मधुबाला जोशी (चिंचाळकर) यांनी व्यक्त केले त्या योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी, श्रीमती कमल खुरसाळे न्यास, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, श्रीमती गो. कु. यो. कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीरात त्या बोलत होत्या.आपल्या ओघवत्या शैलीत आणि आकर्षक पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी शिबीरार्थी विद्यार्थिनींना थेट पृथ्वीच्या दक्षिण टोकावर, म्हणजेच ’अंटार्क्टिका’ खंडावर नेले एक अतिशय वेगळी अनुभवली अंटार्क्टिका म्हणजे केवळ बर्फ नाही, तर निसर्गाचा एक चमत्कार असल्याचे सांगून डॉ. मधुबाला जोशी यांनी पीपीटीच्या माध्यमातून तिथले निळेभोर हिमनग आणि अथांग पसरलेली पांढरी शुभ्र चादर यांचे जे दर्शन त्यांनी घडवले, ते डोळे दिपवणारे होते तिथली जीवसृष्टी अनोखी असून उणे तापमानातही आनंदाने डोलणारे पेंग्विन्स,सील मासे आणि तिथले समुद्री जीव यांच्याबद्दलची मधुबाला जोशी त्यांची माहिती ऐकून निसर्गाच्या विलक्षण शक्तीची जाणीव झाली अंटार्क्टिका हे केवळ पर्यटनाचे ठिकाण नसून विज्ञानाच्या अभ्यासासाठी महत्वाचे आहे तिथे होणारे संशोधन आणि भारताची ’भारती’ व ’मैत्री’ ही संशोधन केंद्रे कशी कार्यरत आहेत, हे डॉ.जोशी यांनी एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितले बदलत्या हवामानाचा अंटार्क्टिकावर काय परिणाम होतोय आणि त्याचे भविष्यातील धोके काय असू शकतात, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. संपूर्ण व्याख्यानात त्यांनी एका साहसी प्रवासाचा अनुभव विषद केला.प्रारंभी त्यांचे स्वागत योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी संस्था पदाधिकारी, संचालक,विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS