बीड : येथील सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष-2025-26 मधील इयत्ता बारावी वर्गाच्या विद

बीड : येथील सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष-2025-26 मधील इयत्ता बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारीमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचा निकाल 79.12% , कला विभाग 47.05 ,कॉमर्स 95.23 तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा 66.66% एवढा निकाल लागलेला आहे.संस्कृत विषयात गोकुळे श्रीनिवास व बोराडे अंजली यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. चि. उत्कर्ष उमेश बोबडे विज्ञान शाखेतून 80.67 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तर कला शाखेत सोहम ज्ञानेश्व्र मांगरे 61.50 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे. वाणिज्य् शाखेतून वैष्णवी अण्णासाहेब जाधव प्रथम आली आहे. तसेच एमसीव्हीसी शाखेतून तेजस्वी मिलींद डोळस 64.50% गुण घेऊन प्रथम आली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ.दीपाताई भारतभूषण क्षीरसागर ,संस्थेचे सचिव डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर नगरसेवक तथा नवगण शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. सारिका क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विश्वंभर देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ.अनिता शिंदे, डॉ.नारायण काकडे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.खान ए.एस,पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर, केंद्रसंचालक प्रा. साळुंखे पी. ए. महाविद्यालयातील शिक्षक वृंद आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS