मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपवि

मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपविभागात कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, आणि उप अभियंता अजय बापट या दोन अधिकार्यांनी धुडगूस घालत, बोगस निविदा प्रक्रिया राबवत, तसेच आदिवासी विकासाचा निधी घशात घालत तब्बल 300 कोटींपेक्षा अधिक निधींचा अपहार केला आहे, याप्रकरणी कार्यकारी अभियंता महेंद्र किणी अणि उप अभियंता अजय बापट यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीकडून खुली चौकशी, तसेच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून त्यांच्या संपत्तीची चौकशी करून मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन दैनिक लोकमंथनचे संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी एसीबी आणि ईडीकडे दिले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, उप अभियंता अजय बापट यांना डहाणू आणि पालघर हाच विभाग का आवडतो, इथेत ते सातत्याने नोकरी का करतांना दिसून येत आहे, याचे उत्तर त्यांच्या आर्थिक अपहारात दडलेले दिसून येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालघर उपविभागात तब्बल 300 कोटींची कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डीपीडीसी, एमओडब्ल्यू, आदिवासी विकास आणि देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आली. या कामांमध्ये अजय बापट यांनी संगनमताने कोट्यावधींची निधी कामे न करताच हडप केला असून, याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खातेनिहाय चौकशी या अधिकार्याची होणे गरजेचे आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. या उपविभागात टेंडर कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घोटाळा घालण्यात आला असून, त्यामध्ये प्रामुख्याने टेंडर क्लार्क मनीष म्हात्रे याने कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव आणि शाखा अभियंता यांच्या वरदहस्ताने हा घोटाळा घालत या सर्वच अधिकार्यांनी संगनमताने कोटयावधी रूपयांचा मलिदा लाटत शासकीय निधीचा अपहार केला आहे.
अजय जाधव हे याच उपविभागात पूर्वी शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. सध्या ते उप अभियंता या पदावर कार्यरत आहेत. जुन्याच विभागात पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर बोगस निविदा, अपूर्ण कामे आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या कथित अपहाराचे प्रकार अधिक वाढले असून अजय बापट यांनी कोट्यावधींची संपत्ती जमा केली असून, याप्रकरणी ईडीने त्यांची खुली चौकशी करून त्यांच्या संपत्तीची, त्यांच्या नातेवाईकांना दिलेली संपत्ती यांची चौकशी करून ईडीने मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
भिवंडीतील उप अभियंता गीतेंचा कोट्यावधींचा अपहार
भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभागातील उप अभियंता गीते यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलीत रंगतांना दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता पदाचा एक वर्षाचा अतिरिक्त कार्यभार, त्यासोबतच कोट्यावधींची बोगस बिले, कामे न करताच देयके अदा करण्याचा सपाटा, असा कोट्यावधींचा अपहार गीते यांनी केला असून, याप्रकरणी चौकशी होण्याची मागणी होत आहे.

COMMENTS