Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले

अंबाजोगाई : भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांनी सांगितलेल्या मौलिक विचारांचे मूल्यां

नांदेडमध्ये निळा महासागर उसळला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबई निळ्या प्रकाशाने उजळून निघाला!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मानवंदना


अंबाजोगाई : भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांनी सांगितलेल्या मौलिक विचारांचे मूल्यांचे प्रकटीकरण करणारा जनप्रबोधनपर क्रांतिकारी भीमगीतांचा जलसा अंबाजोगाई येथे साठेनगर, परळी वेस येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले व न्यूज लोकमनचे संपादक संजय जोगदंड यांनी यावेळी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सदरील कार्यक्रम बुधवार, दिनांक 6 मे 2026 रोजी साठेनगर, मांडवा रोड, परळी वेस, अंबाजोगाई येथे संध्याकाळी 6.30 वाजता संपन्न होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून लोककला लोकगीते आणि कलाकारांद्वारे प्रदर्शित करण्यात येणारी कला यांना सन्मान दिला होता. व्याख्यात्याचे दोन तासांचे भाषण आणि कलाकाराचे पाच मिनिटांचे गाणे हे एकाच ताकदीचे असतात असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात म्हटले होते. अंबाजोगाई येथील स्थानिक कलाकारांचा हा ताफा भीमगीतांचा क्रांतिकारी जलसा आपल्यासमोर गाण्यांच्या स्वरूपात गाऊन दाखविणार आहेत. अंबाजोगाईतील अनेक कलाकार महाराष्ट्रातल्या विविध भागात जाऊन त्यांची कला सादर करीत असतात असा नांवलौकिक असणारे हे कलाकार त्यांना अंबाजोगाई मध्ये हा कला मंच गेल्या अनेक वर्षांपासून न्यूज लोकमनच्या वतीने आम्ही उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती आयोजक राजेश इंगोले यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ राजेश इंगोले यांच्यासह न्यूज लोकमनचे संपादक संजय जोगदंड, महादेव माने, विकास एडके, तुकाराम सुवर्णकार, गणेश काळे प्रयत्न करीत आहेत. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध गायक कलावंत राजकुमार ठोके, बळीराम उपाडे, गौतम सरवदे, सुभाष शेप, राजाभाऊ इंगळे, शिरसाट, विकास एडके, महादेव माने, राहुल सुरवसे, आसाराम जोशी, प्रदीप चोपने, अमोल तरकसे, नारायण साठे, महेश गीते, वशिष्ठ काचगुंडे, स्विथम इंगळे, रफिक शेख यांच्यासह सुप्रसिद्ध गायिका विद्या बनसोडे, मयुरी मजगे, क्रांती एडके, रोहिणी गायकवाड व धनश्री यादव हे भीमगीतांचा नजराना सर्व रसिक प्रेक्षकांसमोर पेश करणार आहेत. तरी अंबाजोगाई परिसरातील आंबेडकरवादी आंबेडकर प्रेमी जनतेने या जनप्रबोधनपर क्रांतिकारी भीमगीतांचा जलशासाठी उपस्थित राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी हजर राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

COMMENTS