Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेपेवाडी येथे भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे वृद्धाचा होरपळून मृत्यू, मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी

किल्ले धारूर : धारूर तालुक्यातील रेपेवाडी येथे मंगळवारी सायंकाळी सुमारे 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागून एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल

लिखित मराठी भाषणात विधानसभा अध्यक्षांकडून २६ चुका; काँग्रेसने व्यक्त केला तीव्र जाहीर निषेध
कोल्हारजवळील गर्भगिरी डोंगराला भीषण आग;एक हजार एकर क्षेत्राचे नुकसान, पशुपक्षी, झाडांची राख
देशभरात कोट्यवधी मोबाईलवर एकाच वेळी अलर्ट; सायरनचा आवाज ऐकू आला, आपत्कालीन विभागाने घेतली चाचणी

किल्ले धारूर : धारूर तालुक्यातील रेपेवाडी येथे मंगळवारी सायंकाळी सुमारे 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागून एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात पशुधनाचेही नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रामभाऊ रेपे यांच्या गोठ्याला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच आग वेगाने पसरल्याने गोठ्यात अडकलेले रामभाऊ एकनाथ रेपे (वडील) हे बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. या दुर्घटनेत अंदाजे दहा गायी, पंधरा शेळ्या तसेच सुमारे दीडशे कोंबड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात पशुधन व गोठ्याचे साहित्य जळून नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्रीकांत निळे तसेच धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाकडून पंचनामा सुरू असून एकूण नुकसानाचा अंदाज घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रेपेवाडी गावावर शोककळा पसरली असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS