Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी आळेकर

श्रीगोंदा : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या संचालकपदी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष एकनाथराव आळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व संचालक बाबासाहेब भोस यांनी राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळातील सर्वसाधारण मतदारसंघ (श्रीगोंदा गट क्रमांक १) मधील एक जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या मान्यतेने ही नैमित्तिक रिक्त जागा भरण्यासाठी ३० मार्च रोजी कारखाना कार्यस्थळावर विशेष बैठक पार पडली. ही बैठक प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहिल्यानगर तथा अध्यासी अधिकारी संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये संचालक लक्ष्मणराव रायकर यांनी एकनाथराव आळेकर यांच्या नावाची सूचना मांडली, तर श्रीनिवास घाडगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आळेकर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. एकनाथराव आळेकर यांनी श्रीगोंदा नगरपालिका तसेच इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, व्हा. चेअरमन मेघा औटी, संचालक मंडळ सदस्य तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, दूध संघाचे चेअरमन दिलीप वागस्कर आदी मान्यवरांनी आळेकर यांचे अभिनंदन केले.

टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका
शिरसगाव बोडखा सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी देशमुख  
सहा कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित

श्रीगोंदा : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या संचालकपदी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष एकनाथराव आळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व संचालक बाबासाहेब भोस यांनी राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळातील सर्वसाधारण मतदारसंघ (श्रीगोंदा गट क्रमांक १) मधील एक जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या मान्यतेने ही नैमित्तिक रिक्त जागा भरण्यासाठी ३० मार्च रोजी कारखाना कार्यस्थळावर विशेष बैठक पार पडली.

ही बैठक प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहिल्यानगर तथा अध्यासी अधिकारी संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये संचालक लक्ष्मणराव रायकर यांनी एकनाथराव आळेकर यांच्या नावाची सूचना मांडली, तर श्रीनिवास घाडगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आळेकर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.

एकनाथराव आळेकर यांनी श्रीगोंदा नगरपालिका तसेच इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, व्हा. चेअरमन मेघा औटी, संचालक मंडळ सदस्य तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, दूध संघाचे चेअरमन दिलीप वागस्कर आदी मान्यवरांनी आळेकर यांचे अभिनंदन केले.

COMMENTS