Homeताज्या बातम्या

राष्ट्रीय माध्यमिक व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

बीड: राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय अभ्यासक्रम व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय, बीड येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती तसे

मुंबई महापालिकेला तुकाराम मुंढेंचा दणका; पालिका मुख्यालयातील कँटीन केले सील!
देवळाली प्रवरा येथील दोन उद्योजक शेतकरी पुत्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विशेष गौरव
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करा, शाळा सक्षम करा; मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचे आवाहन

बीड: राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय अभ्यासक्रम व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय, बीड येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. आय. पाटील तसेच ज्येष्ठ प्राध्यापक ए. बी. उगले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. ओमकार चांदणे याने लोकमान्य टिळक, तर विश्वराज चांदणे आणि अंकित झेंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

प्रा. ए. बी. उगले यांनी आपल्या मार्गदर्शनातून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. प्रमुख पाहुणे ए. आय. पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे दलित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य पी. एन. पाटील यांनी लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी नेतृत्व होते, तर अण्णाभाऊ साठे हे खर्‍या अर्थाने साहित्यरत्न असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. के. वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. आर. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS