Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करा, शाळा सक्षम करा; मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचे आवाहन

बीड: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकीय यंत्रणेने प्रभावीपणे काम करावे. प्रत्येक विद्यार्थ्य

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक; झंडू कुमारने पटकवले कांस्यपदक
राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत तुलसी इंग्लिश स्कूलच्या तीन खेळाडूंची निवड; बीडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
युवक-युवतींनी माय भारत पोर्टलवर १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन

बीड: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकीय यंत्रणेने प्रभावीपणे काम करावे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला आवश्यक मार्गदर्शन द्यावे आणि शाळा सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षण विभाग (प्राथमिक) व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पर्यवेक्षकीय यंत्रणा सक्षमीकरण कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. पुढे बोलताना जितीन रहमान म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये केवळ पाठांतरावर भर न देता विषय समजून घेणे, विश्लेषण करणे आणि क्रिटिकल थिंकिंगची क्षमता विकसित करा. दर महिन्याचा चौथा शनिवार पूर्ण दिवस विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी दिला जाणार असून, या कामाचा आढावा दर १५ दिवसांनी घेतला जाईल. शासनाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करताना निपुण महाराष्ट्र अभियान, युडायस, आधार नोंदणी, विद्यार्थी उपस्थिती व सुरक्षा या बाबी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी केले, तर डाएट अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे यांनी पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या शाळा भेटींबाबत मार्गदर्शन केले. डॉ. भागीरथी गिरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि पायाभूत साक्षरतेवर, तर प्रतिभा देशपांडे यांनी वाचन-लेखन कौशल्यांवर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक संदीप पवार, डॉ. विकास परदेशी व ज्ञानेश्वर तळेकर यांनी शाळा विकास व स्पर्धा परीक्षा तयारीबाबत माहिती दिली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी नवनियुक्त केंद्रप्रमुखांशी संवाद साधत आगामी १०० दिवसांत आपल्या केंद्रातील १०० टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कृती कार्यक्रम तयार केला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कार्यशाळेत ‘प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कार’ प्राप्त राजुरी येथील रोहन रामचंद्र बहिर तसेच ऊसतोड कामगार कुटुंबातून येत ‘NEET 2026’ परीक्षेत ५९० गुण मिळवून MBBS प्रवेशासाठी पात्र ठरलेला ज्ञानेश्वर पडवळे (काचरवाडी शाळा) या दोघांचा मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते विशेष नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन राहुल चाटे आणि श्रीकांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS