Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर

कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील एकमेव असणारा प्रतापगड सहकारी करखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आवश्यकता भासल्

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 
कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची गृहराज्य मंत्र्यांकडून पाहणी
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारिकरणाला येणार गती

कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील एकमेव असणारा प्रतापगड सहकारी करखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आवश्यकता भासल्यास 13 मार्चला मतदान व 14 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी कथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) धनंजय डोईफोडे यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातून प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंबंधी अधिसूचना जारी केली आहे.
प्रतापगडच्या संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार असून यामध्ये व्यक्ती व ऊस उत्पादक सभासद गटातून एकूण 15 जागा आहेत. त्यामध्ये कुडाळ, खर्शी, सायगाव, हुमगाव, मेढा, महाबळेश्‍वर अशा पाच गटातून संचालक मंडळाच्या प्रत्येकी तीन जागा आहेत. उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था यातून एक, महिला- 2, अनुसूचित जाती व जमाती -1, विमुक्त जाती व भटक्या जमाती-1, इतर मागास प्रवर्ग -1 अशा एकूण 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
4 ते 10 फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून 11 फेब्रुवारीला दाखल अर्जाची छाननी होईल. 28 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 2 मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होईल. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल. आवश्यकता असल्यास 13 मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान व 14 फेब्रुवारीला सकाळी 8 पासून मतमोजणी सुरू होणार आहे.

COMMENTS