Homeताज्या बातम्या

देवळाली प्रवरा येथील दोन उद्योजक शेतकरी पुत्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विशेष गौरव

देवळाली प्रवरा: छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या

देवळाली प्रवरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय तरुण ठार
अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा; सांगलीतील धक्कादायक घटना, संशयित पत्नी व प्रियकर ताब्यात
गेवराई तालुक्यातील अग्रगण्य ग्रामपंचायतीच्या नाकावर टिच्चून चकलांबा जि.प. माध्यमिक शाळेत घाणीचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे आरोग्य वार्‍यावर

देवळाली प्रवरा: छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात देवळाली प्रवरा येथील दोन उद्योजक शेतकरी पुत्रांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

देवळाली प्रवरा येथील ‘एसपी ॲग्रो इनोव्हेशन एलएलपी’ या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम उभारणाऱ्या प्रसाद आप्पासाहेब देशमुख व सौरभ राजेंद्र कदम यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कृषी क्षेत्रातील नवकल्पना तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी केलेले कार्य याची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्रदान करण्यात येणार आहे.

सारथी संस्थेच्या विविध उपक्रमांत यशस्वी ठरलेल्या लाभार्थी, उद्योजक व गुणवंतांचा सन्मान मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असून या मानाच्या सोहळ्यासाठी राज्यभरातील निवडक व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा दि. २६ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला असून देवळाली प्रवरा परिसरासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे येत कृषी क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या प्रसाद देशमुख व सौरभ कदम यांच्या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे जोरदार अभिनंदन होत आहे.

COMMENTS