Homeताज्या बातम्या

बेलापूर येथे अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्तही अभिवादन

बेलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती बेलापूर ग्रामपंचायत तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने मोठ्या

परळी वैजनाथ बस स्थानक परिसर चिखलमय; आषाढी एकादशीच्या काळात प्रवासी व भाविक हैराण
पारधी समाजातील महिलेवर जीवघेणा हल्ला; विनयभंग, लूट व बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप
“प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..”; विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज

बेलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती बेलापूर ग्रामपंचायत तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच वेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत त्यांची पुण्यतिथीही श्रद्धापूर्वक संपन्न झाली.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक व्यासपीठ सजवण्यात आले होते. अण्णा भाऊंचे पोवाडे, क्रांतिकारी गीते, वाद्यवृंद आणि भव्य घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बेलापूर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर आणि ग्रामस्थांनी अण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयातही अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष रोहन शेलार, उपाध्यक्ष आदित्य शेलार, बाबासाहेब शेलार, रमेश शेलार, प्रदीप (बंटी) शेलार, शामराव शेलार, अजय शेलार, सुहास शेलार, रोहित शेलार, राहुल शेलार, सोहेल बागवान, ऋतिक शेलार, निशांत शेलार, संदेश शेलार, आतिश शेलार, अनिकेत शेलार, महेश मिसाळ, विशाल घोडेकर, निलेश वायदंडे, गौरव शेलार, सुमित शेलार, आनंद शेलार, अर्जुन दोडके, काकडे आणि झाहीद शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS