Homeताज्या बातम्या

नांदेड विभागाची विशेष तिकीट तपासणी मोहीम; ३३९ विनातिकीट प्रवाशांकडून २.३३ लाखांचा दंड वसूल

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे महसुलाचे संरक्षण आणि वैध तिकीटधारक प्रवाशांना विनाअडथळा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्य

सलोखा आणि संवाद महत्त्वाचा! जंतर-मंतरवरील आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर उठले प्रश्नचिन्ह
पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी
मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; पुढील चार दिवस अनेक भागांत सतर्कतेचा इशारा
Ticket Checking : नांदेड विभागाचे विशेष तिकीट तपासणी अभियान; 339 विनातिकीट  व अनियमित प्रवाशांकडून ₹2.33 लाखांचा दंड वसूल

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे महसुलाचे संरक्षण आणि वैध तिकीटधारक प्रवाशांना विनाअडथळा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३१ जुलै रोजी विशेष मॅसिव्ह तिकीट तपासणी मोहीम राबविली. या कारवाईत ३३९ विनातिकीट व अनियमित प्रवाशांविरुद्ध कारवाई करून एकूण २ लाख ३३ हजार ३०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (एसीएम) शैलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ५ ते रात्री ८.३० या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. विभागातील २४ रेल्वेगाड्यांमध्ये २८ तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली. या मोहिमेत २२६ विनातिकीट प्रवाशांकडून २,००,६८५ रुपये, २० अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून १५,८१५ रुपये, तर बुक न केलेल्या सामानाच्या ९३ प्रकरणांतून १६,८०० रुपये असा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, वैध तिकीटधारक प्रवाशांना अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणे, विनातिकीट प्रवासाला आळा घालणे आणि रेल्वे महसुलाचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रवाशांनी वैध तिकीट किंवा अधिकृत प्रवास परवानगी घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले असून भविष्यातही अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS