लोहा : नेत्याच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी उसळलेली गर्दी त्या नेतृत्वाचे सामान्य जनतेतील आपुलकीचे स्थान अधोरेखित करते. लोहा-कंधार शहर व ग

लोहा : नेत्याच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी उसळलेली गर्दी त्या नेतृत्वाचे सामान्य जनतेतील आपुलकीचे स्थान अधोरेखित करते. लोहा-कंधार शहर व ग्रामीण भागात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. नांदेड ते लोहा, कंधार ते किवळा-सिडको या मार्गावर जागोजागी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि केक कापून समर्थकांनी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात आ. चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा केला.
लोहा शहरात रविवारी (२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आगमन झाले. जवळपास पाच तास शहरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगतज्योती महात्मा बसवेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार माधवराव जवळगावकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, माँ जिजाऊ अर्बन बँकेच्या चेअरमन प्रणिताताई देवरे-चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, युवा नेते सचिन पाटील यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच देगलूर, मुखेड, हदगाव परिसरातूनही कार्यकर्त्यांनी लोह्यात येऊन चिखलीकर यांना शुभेच्छा दिल्या.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या सुशोभिकरणाचा शुभारंभ
नगर परिषद प्रांगणातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचा शुभारंभ आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना, “समाजबांधवांना दिलेले आश्वासन पूर्ण करत असताना विकासकामांमध्ये राजकारण येऊ नये,” असे प्रतिपादन आ. चिखलीकर यांनी केले. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह बसवेश्वर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS