Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पोखरीघाट ग्रामस्थांचा आदर्श पायंडा!हरिनाम सप्ताहात कुस्ती खेळाला प्रोत्साहन-राजेंद्र मस्के

कुस्ती हा भारताचा पारंपरिक, ताकदीचा आणि मानाचा खेळ असून तो केवळ शारीरिक क्षमता नव्हे तर शिस्त, धैर्य आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक मानला जातो.

नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
पेट्रोल-डीजल दरवाढीचे संकट: तेल कंपन्यांचा तोटा ३० हजार कोटींच्या पार
नांदेड मनपा क्षेत्रात जनगणनेच्या कामात सावळागोंधळसाहित्याअभावी प्रगणक हवालदिल, तर प तांत्रिक अडचणींच्या गर्तेत!


कुस्ती हा भारताचा पारंपरिक, ताकदीचा आणि मानाचा खेळ असून तो केवळ शारीरिक क्षमता नव्हे तर शिस्त, धैर्य आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक मानला जातो. युवकांनी या खेळाचा अंगीकार करून शरीरासोबत मनही सक्षम व सुदृढ करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले.
पोखरीघाट ग्रामस्थांनी अध्यात्म आणि शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले असून अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करून मेहनती पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा आदर्श पायंडा निर्माण केला आहे. हा उपक्रम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजवावा, असे आवाहनही मस्के यांनी यावेळी केले. पोखरीघाट (ता. बीड) येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थांचे महंत महादेव महाराज भारती व हभप तुकाराम महाराज भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भावार्थ रामायण व त्रिदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता हभप मारुती महाराज चोरमुले यांच्या कीर्तनाने झाली. या निमित्ताने एकूण 42 जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून तब्बल 7 लाख 65 हजार रुपयांची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली. बक्षिसांची सुरुवात 1,100 रुपयांपासून करण्यात आली होती. थरारक आणि चुरशीच्या कुस्त्यांनी मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता हजारो प्रेक्षकांनी कुस्ती मैदानाचा आनंद घेतला. लिंबागणेश-पोखरी परिसरातील अबालवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांना तोबा गर्दी केली होती. यापूर्वीही पोखरीघाट ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेची भव्य इमारत उभारून शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता अध्यात्मिक हरिनाम सप्ताहात कुस्ती स्पर्धांचा प्रेरणादायी उपक्रम राबवून ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला आहे. सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

COMMENTS